आयटीआर भरूनही रिफंड जमा झाला नाही? 'या' ५ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा आयटीआर रिफंड; असा तपासा स्टेटस


मुंबई: (ITR Refund) आयकर परतावा (ITR) फाइल करण्याची अंतिम मुदत संपून १० दिवस उलटले आहेत. दरम्यान, आयकर विभागाकडून करदात्यांच्या बँक खात्यात रिफंडची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक करदात्यांच्या खात्यात अजूनही रिफंड जमा न झाल्याने त्यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. अशा वेळी घाबरून न जाता रिफंड का अडकला आहे, याची कारणे शोधणे आणि घरबसल्या ऑनलाईन स्टेटस तपासणे आवश्यक आहे. (ITR Refund)

आयटीआर अजून 'Under Processing' असणे...

३१ जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. आयकर परतावा दाखल केल्यानंतर आयकर विभागाकडून मिळकत व कर कपातीची पडताळणी केली जाते. सामान्यतः रिफंडची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवसांपासून ते १ महिन्याचा कालावधी लागू शकतो. ई-फायलिंग पोर्टलवर 'Return Under Processing' असा स्टेटस दिसत असल्यास, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच रिफंड जारी केला जाईल. (ITR Refund)

रिफंड अडकण्याची मुख्य ५ कारणे

जर तुमच्या आयटीआरचा रिफंड रखडला असेल, तर त्यामागे खालील ५ प्रमुख चुका असू शकतात. (ITR Refund)

१. बँक खाते प्री-व्हॅलिडेट (Pre-validated) नसणे: रिफंड जमा होण्यासाठी बँक खाते ई-फायलिंग पोर्टलवर प्री-व्हॅलिडेट असणे गरजेचे आहे. तसेच पॅन कार्ड (PAN) लिंक नसणे, खाते क्रमांक किंवा IFSC कोड चुकीचा असणे यांमुळे रिफंड अडकतो. (ITR Refund)

२. ITR भरताना चुकीची माहिती देणे: उत्पन्न, डिडक्शन (Tax Deductions) किंवा वैयक्तिक तपशीलात चूक झाल्यास रिटर्न प्रोसेसिंग थांबते. अशा वेळी 'Revised Return' दाखल करून चूक दुरुस्त करावी लागते. (ITR Refund)

३. TDS आणि AIS/26AS मधील तफावत: करदात्याने दावा केलेला TDS आणि Form 26AS किंवा AIS (Annual Information Statement) मधील माहिती जुळत नसेल, तर आयकर विभाग रिटर्नची पुन्हा सखोल तपासणी करतो. (ITR Refund)

४. आयटीआर स्क्रूटनीसाठी निवडला जाणे: उत्पन्नातील मोठी तफावत किंवा संशयास्पद माहिती आढळल्यास रिटर्न स्क्रूटनीसाठी निवडला जाऊ शकतो. (ITR Refund)

५. आयकर विभागाच्या नोटीसकडे दुर्लक्ष: नोटीस किंवा ई-मेल आल्यास त्याला वेळेत आणि योग्य उत्तर न दिल्यास रिफंडची प्रक्रिया पूर्ण होत नाही. (ITR Refund)

करदात्यांनी त्वरित 'हे' काम करावे

जर तुमचा रिफंड वेळेत मिळाला नसेल, तर सर्वात आधी ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन:

आयटीआर स्टेटस (ITR Status) तपासा.

बँक खाते व्हॅलिडेट आहे का आणि पॅन लिंक आहे का याची खात्री करा.

TDS, Form 26AS आणि AIS मधील माहिती तपासून घ्या.






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर