विद्वान सर्वत्र पूज्यते! ज्येष्ठ संस्कृत अभ्यासिका विदुषी प्रा. डॉ. कला आचार्य यांचे निधन

    10-Aug-2026

Dr. Aacharya 
 
मुंबई :  (DrKalaAcharya) 
 
विद्वत्त्वं च नृपत्त्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते ॥
 
'राजा आणि विद्वान यांची तुलना कधीच होऊ शकत नाही; कारण राजाला फक्त त्याच्या राज्यात सन्मान मिळतो, पण ज्ञानी व्यक्तीला संपूर्ण जगात आदर मिळतो.' या सुप्रसिद्ध सुभाषिताचा प्रत्यय डॉ. कला आचार्य यांच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहताना येतो. अशा संस्कृत भाषेतील विशारद, भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास आणि जागतिक स्तरावर हिंदू तत्त्वज्ञानाची अभ्यासू मांडणी करणाऱ्या विदुषी प्रा. डॉ. कला आचार्य यांचे सोमवारी, १० ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने संस्कृत भाषा, सनातन परंपरा आणि आंतरधर्मीय संवादाच्या क्षेत्रातील एक दीपस्तंभ मालवला असून संपूर्ण अभ्यासक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.  (DrKalaAcharya)
 
डॉ. कला आचार्य यांनी हिंदू धर्माला केवळ रूढी आणि परंपरेपुरते मर्यादित न ठेवता, त्यातील उच्च विचार, अध्यात्म आणि उदात्त जीवनपद्धती जगासमोर मांडली. कझाकस्तान, व्हॅटिकन सिटी, अमेरिका आणि युरोप यासारख्या पाश्चात्य देशातील अनेक नामांकित परिषदांमध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. पाश्चात्य विद्यापीठांमध्ये विविध धर्मांच्या विचारवंतांशी चर्चा करून पाश्चात्य देशातील हिंदू धर्माविषयीचा वेगळा समज दूर केला आणि ' वसुधैव कुटुंबकम् ' या उपनिषदाचा विचार प्रत्यक्षात उतरवला.  (DrKalaAcharya)
 
१९८९ मध्ये स्थापन झालेल्या 'के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठा'च्या त्या संस्थापक-संचालक होत्या. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण-तरुणींना वेदांत, उपनिषदे आणि भगवद्गीतेचे धडे देऊन घडवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे ५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून संस्कृत साहित्य आणि आंतरधर्मीय संवाद या विषयांवर त्यांनी अनेक मोलाच्या ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले.  (DrKalaAcharya)

संस्कृत विषयातील प्रदीर्घ अभ्यास व संशोधनाबद्दल भारत सरकारने त्यांना २०१९ साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले. त्यासोबतच आंतरधर्मीय शांतता आणि संवादासाठी कझाकस्तानच्या राष्ट्रपतींकडून त्यांना स्पिरिच्युअल लाईट या सर्वोच्च सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना संस्कृत पंडिता ही पदवी प्रदान केली होती. . कला आचार्य यांनी आपल्या अथांग ज्ञानाने आणि व्यासंगाने हिंदू तत्त्वज्ञानाची मान जगभरात उंचावली. त्यांच्या निधनाने सनातन विचार आणि वैदिक साहित्याचा एक खंबीर, अभ्यासू आणि प्रामाणिक आवाज शांत झाला आहे.  (DrKalaAcharya)





संबंधित मजकूर