मुंबई(Mill Worker Rehabilitation): मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच पुनर्वसन मुंबई शहरातच व्हावे या मागणीसाठी आंबेडकर भवन, दादर पूर्व येथे रविवार दि.९ रोजी गिरणी कामगार क्रांती सभेचे आयोजन संयुक्त मराठी मुंबई संघाच्या वतीने करण्यात आले होते.(Mill Worker Rehabilitation)
'घर आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'मुंबई आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची', 'लढूया जिंकूया', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने यांनी यावेळी गिरणी कामगारांच्या अडचणी मांडल्या.गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास गिरणी कामगार राज्यभर जनआंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.(Mill Worker Rehabilitation)