डोंबिवली (Dombivli Railway Ticket Check):रेल्वे प्रशासनाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहीमेत एकूण ३६२ प्रवासी विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून एकूण १ लाख ८२ हजार ३१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.(Dombivli Railway Ticket Check)
रेल्वे प्रशासनाकडून कडक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली असून त्यात मोठ्या प्रमाणावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेसाठी १५ टीटीई, ६ आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या कारवाईमध्ये ४ प्रवासी एसी डब्यात विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून २ हजार ४१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर प्रथम श्रेणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५१ प्रवाशांकडून २८ हजार ७९५ रुपये, तर द्वितीय श्रेणीतील २३४ विनातिकीट प्रवाशांकडून १ लाख १९ हजार ४२५ रुपयांचा दंड आकारण्यात आला.(Dombivli Railway Ticket Check)
याशिवाय ६१ प्रवाशांकडे नोंदणी न केलेले सामान आढळल्याने त्यांच्याकडून ७ हजार ६८० रुपये दंड वसूल करण्यात आला. एका अनधिकृत फेरीवाल्यावर २ हजार रुपयांची कारवाई, तर दिव्यांगजनांसाठी राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या ११ प्रवाशांकडून २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर अशाच प्रकारे कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे या मोहिमेतून दिसून येत आहे.(Dombivli Railway Ticket Check)