पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आंध्र प्रदेशातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, विमानतळाला क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजूंचे नाव, नेमके कोण होते ब्रिटिश सैन्याला आव्हान देणारे अल्लुरी सीताराम राजू? वाचा सविस्तर
अमरावती (Alluri Sitarama Raju) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार १ ऑगस्ट २०२६ रोजी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील भोगपूरम् येथे विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी भोगपूरम् येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनलचे लोकार्पण केले. तसेच १७ हजार ९०० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.
पंतप्रधानांचा हा दौरा केवळ विमानतळाच्या उद्घाटनापुरता मर्यादित नसून आंध्र प्रदेशातील पायाभूत सुविधा, उद्योग, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्राला नवी गती देणारा ठरला. विशेष म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांच्या स्मृतीला राष्ट्रीय स्तरावर गौरव देत या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. (Alluri Sitarama Raju)
భోగాపురంలో అల్లూరి సీతారామ రాజు అంతర్జాతీయ విమానాశ్రయం ప్రారంభమైన సందర్భంగా ఆంధ్రప్రదేశ్కు చెందిన నా సోదరీ సోదరులందరికీ హృదయపూర్వక అభినందనలు.
ఈ విమానాశ్రయానికి అల్లూరి సీతారామ రాజు పేరు పెట్టడం కూడా, మన ఘన చరిత్రలో స్ఫూర్తిదాయకమైన మహనీయుల సేవలను గుర్తించి గౌరవించాలనే మా… pic.twitter.com/bR0S60GVA1
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मीकी यांचे नाव देण्यात आले. पंजाबमध्ये संत रविदास यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण करण्यात आले. आता केंद्रातील 'एनडीए' सरकारने नव्या विमानतळाला श्री अल्लुरी सीताराम राजू यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे."
या दौऱ्यात पंतप्रधानांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या औद्योगिक व ऊर्जा प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्यामध्ये विशाखापट्टणम येथे ४६० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीत उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचा (ASIP Semiconductor Project) समावेश आहे. ASIP टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि दक्षिण कोरियातील APACT कंपनीच्या सहकार्याने उभारला जाणारा हा प्रकल्प भारत सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत मंजूर झाला असून, येथे दरवर्षी सुमारे ९६ दशलक्ष सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेला मोठे बळ मिळणार आहे. (Alluri Sitarama Raju)
కేంద్రంలోనూ, ఆంధ్రప్రదేశ్లోనూ పాలిస్తున్న ఎన్డీఏ ప్రభుత్వం రాష్ట్ర ప్రగతి కోసం విశేష వేగంతో పనిచేస్తోంది. బ్లూ ఎకానమీ, నౌకాశ్రయాల అభివృద్ధి, పారిశ్రామిక వృద్ధి తదితర రంగాలపై మేము ప్రత్యేక దృష్టి సారిస్తున్నాం. pic.twitter.com/6Hx6ejqpkx
याशिवाय, पंतप्रधानांनी कुरनूल-IV नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी ४.५ गिगावॅट क्षमतेच्या ट्रान्समिशन प्रणालीचे भूमिपूजन केले. सुमारे ५ हजार ५५० कोटींच्या गुंतवणुकीत पॉवरग्रिडकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच ३ हजार ५५० कोटी खर्चून विकसित करण्यात आलेल्या कुरनूल पवन व सौर ऊर्जा क्षेत्र आणि ८२० कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या अनंतपूर व कुरनूल सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या ट्रान्समिशन योजनांचेही उद्घाटन करण्यात आले.
या ट्रान्समिशन प्रणालीमुळे आंध्र प्रदेशातील दुर्गम भागात निर्माण होणारी हरित ऊर्जा थेट राष्ट्रीय वीज ग्रीडशी जोडली जाणार असून, देशभरातील विविध भागांपर्यंत स्वच्छ वीज पोहोचण्यास मदत होईल. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या जागतिक उद्दिष्टांनाही यामुळे बळकटी मिळणार आहे. (Alluri Sitarama Raju)
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू
४ जुलै १८९७ रोजी जन्मलेले अल्लुरी सीताराम राजू हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतिकारक होते. ब्रिटिशांनी १८८२ मध्ये लागू केलेल्या मद्रास फॉरेस्ट कायद्यामुळे आदिवासी समाजाचे जंगलांवरील हक्क हिरावले गेले. त्याविरोधात राजू यांनी आदिवासींना संघटित करून ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र संघर्ष उभारला. (Alluri Sitarama Raju)
रंपा आणि मान्यम परिसरातील आदिवासी समाज त्यांना प्रेमाने "मान्यम वीरुडू" म्हणजेच "जंगलांचा वीर" म्हणून ओळखत असे. १९२२ ते १९२४ या काळात झालेल्या ऐतिहासिक रंपा उठावाचे त्यांनी नेतृत्व केले. घनदाट जंगलांचा आधार घेत त्यांनी गनिमी कावा वापरून ब्रिटिश सैन्याला मोठे आव्हान दिले.
त्यांच्या लढाईची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, ज्या ब्रिटिश पोलीस ठाण्यावर हल्ला करून शस्त्रे हस्तगत करायची असत, त्या ठाण्याला ते आधीच पत्र पाठवून हल्ल्याची तारीख व वेळ कळवत असत. तरीही ब्रिटिश अधिकारी त्यांना रोखण्यात वारंवार अपयशी ठरले. (Alluri Sitarama Raju)
अखेर मे १९२४ मध्ये विश्वासघातामुळे ब्रिटिशांनी त्यांना पकडले. ७ मे १९२४ रोजी कोय्यूरूच्या जंगलात एका झाडाला बांधून कोणताही खटला न चालवता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अवघ्या २७व्या वर्षी त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भोगापूरम येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आल्याने देशाने या महान क्रांतिकारकाला अभिवादन केले आहे. (Alluri Sitarama Raju)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.