"मी १५ वर्षांची आहे..."; जंतर-मंतरवर पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीचा माफीनामा


नवी दिल्ली: (Ruchika Singh Apology Video) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रुचिका सिंह नावाच्या मुलीचा माफी मागतानाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. "मित्रांच्या प्रभावाखाली येऊन माझ्याकडून चूक झाली, ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे," असे म्हणत तिने जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आंदोलक मुलांना माफ करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. (Ruchika Singh Apology Video)

रुचिका सिंहचा माफीनामा: "माझ्याकडून मोठी चूक झाली"

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माफीनाम्याच्या व्हिडीओमध्ये रुचिका सिंहने तिची बाजू मांडली आहे. "मी मित्रांसोबत कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलक पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करत होते आणि इतरांना उकसवत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी ते चुकीचे विधान केले. मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे बोलले ते माफीच्या लायक नाही, पण कृपया मला माफ करा. ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल." (Ruchika Singh Apology Video)

रुचिका सिंहच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नोएडामधील पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये तिचे वय २५ वर्षे नमूद करण्यात आले आहे, तर व्हिडीओमध्ये मुलीने स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. (Ruchika Singh Apology Video)


"त्या मुलांना योग्य रस्ता दाखवूया"- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ जुलैच्या रात्री इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली. "या आंदोलनात माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले, तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नाही. ही भरकटलेली मुले आहेत. हा एक सांस्कृतिक धक्का नक्कीच आहे, पण या मुलांना न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा त्यांना मिठीत घेऊन योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. मला त्यांना मनापासून माफ करायचे आहे." (Ruchika Singh Apology Video)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर