दैनिक मुंबई तरुण भारतच्या 'युगप्रवर्तक अण्णाभाऊ साठे' विशेषांकाचे प्रकाशन

    01-Aug-2026
Dainik Mumbai Tarun Bharat Annabhau Sathe Visheshank
 
मुंबई : (Dainik Mumbai Tarun Bharat Annabhau Sathe Visheshank) लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त तसेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त चेंबूर येथील द फाईन आर्ट्स सोसायटी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात दैनिक मुंबई तरुण भारतच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक अण्णाभाऊ साठे' या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय सेवांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान विशेषांकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अतुल साळुंखे, आर्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार, दैनिक मुंबई तरुण भारतचे सामाजिक न्याय प्रतिनिधी सागर देवरे, स्पेस सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रशांत कांबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव बळीराम गायकवाड, आर्टीचे संशोधन अधिकारी डॉ. धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई गोपले, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती साठे, आयुर्वेदिक विद्यापीठ, नाशिकचे नॅक व संशोधन समन्वयक डॉ. प्रदीप आवळे, यूपीएससीमध्ये यश मिळविलेल्या प्रेरणा खवळे तसेच एमपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या गीतांजली साठे उपस्थित होत्या.(Dainik Mumbai Tarun Bharat Annabhau Sathe Visheshank)
 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारा हा विशेषांक या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.(Dainik Mumbai Tarun Bharat Annabhau Sathe Visheshank)
 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली.(Dainik Mumbai Tarun Bharat Annabhau Sathe Visheshank)
 
 




संबंधित मजकूर