मुंबई : (Annabhau Sathe Birth Anniversary) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारवारसा जपणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी केले.
सुमन नगर, चेंबूर येथे आयोजित साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती महोत्सवात ते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नीरज उभारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(Annabhau Sathe Birth Anniversary)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रिकरिंग बजेटमधून आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवाला विविध समाजघटकांतील नागरिकांची उपस्थिती होती. या निधीला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून मंजुरी मिळाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.(Annabhau Sathe Birth Anniversary)
कार्यक्रमादरम्यान शासनाच्या विविध योजनांशी संबंधित स्टॉल्सची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा आशाताई मराठे, नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेविका कशिश फुलवरिया तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.(Annabhau Sathe Birth Anniversary)
जयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शंकर शिवाजी कांबळे, समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनाची दखल घेण्यात आली. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थिती लावली.(Annabhau Sathe Birth Anniversary)