नवी दिल्ली (India Bhutan Loan Agreement) : भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना आणखी बळकटी देणारी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चेची पाचवी फेरी नुकतीच पार पडली. या बैठकीत भूतानच्या विकासासाठी विविध महत्त्वाच्या निर्णयांवर सहमती झाली असून, भारताच्या EXIMबँकेने आणि भूतानच्या अर्थ मंत्रालयाने चार हजार कोटी रुपयांच्या सवलतीच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भूतानचे परराष्ट्र सचिव डॅशो पेमा लेकटुप दोर्जी यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भूतानच्या १३व्या पंचवार्षिक योजनेचा (२०२४–२०२९) सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनेसाठी भारताने यापूर्वीच १० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक सहकार्याची घोषणा केली असून, त्याच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचेही परीक्षण करण्यात आले. (India Bhutan Loan Agreement)
VIDEO | Delhi: "Two agreements signed with Bhutan, Line of Credit and AIIMS–Bhutan Health Education MoU," says MEA Spokesperson Randhir Jaiswal on Foreign Secretary's visit to Bhutan.
चार हजार कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज भूतानमधील विविध विकास प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहे. रस्ते व पूल उभारणी, वीज आणि जलविद्युत प्रकल्प, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच डिजिटल आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या निधीचा उपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूतानच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (India Bhutan Loan Agreement)
भारत हा भूतानचा सर्वात मोठा विकास भागीदार मानला जातो. भूतानच्या पंचवार्षिक योजनांना भारत सातत्याने आर्थिक सहाय्य करत आला आहे. दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि मजबूत सुरक्षा सहकार्य यामुळे हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हिमालय भागातील प्रदेशात स्थैर्य आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी भूतानचे महत्त्व भारतासाठी अधिक वाढले आहे.
या बैठकीमुळे भारत-भूतान संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विकास प्रकल्पांना गती, आरोग्य क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाल्याने दोन्ही देशांतील मैत्री आणि विकास सहकार्य आणखी मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. (India Bhutan Loan Agreement)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.