Commonwealth Games 2026: बॉक्सिंगमध्ये भारताचा डंका! प्रीती पवार आणि जॅस्मिन लंबोरियाची 'गोल्डन' कामगिरी; भारताच्या खात्यात ७ सुवर्णपदके


नवी दिल्ली: (Commonwealth Games 2026)
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवशी भारतीय बॉक्सर्सनी क्रीडांगणावर शानदार वर्चस्व गाजवत सुवर्णपदकांचा वर्षाव केला आहे. महिलांच्या ५४ किलो वजनी गटात भारताची 'गोल्डन गर्ल' प्रीती पवार हिने कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यापाठोपाठ महिलांच्या ५७ किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरिया हिने नॉर्दर्न आयर्लंडच्या मिकेला वॉल्शला ५-० असे धूळ चारत भारताला बॉक्सिंगमधील दुसरे आणि या स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक मिळवून दिले. (Commonwealth Games 2026)

प्रीती पवारचा एकतर्फी विजय अन् सुवर्णधमाका

भारतीय मुष्टियोद्धा प्रीती पवारने कॉमनवेल्थ गेम्सच्या सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. फायनलमध्ये कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोला तिन्ही फेऱ्यांमध्ये कोणतीही संधी न देता प्रीतीने एकतर्फी विजय मिळवला. राऊंड ऑफ १६ मध्ये डेबोरा मटेंजे, क्वार्टर फायनलमध्ये नॉर्दर्न आयर्लंडची निकोल क्लाइड आणि सेमिफायनलमध्ये जाम्बियाच्या कॅथरीन म्वापे यांना पराभूत करत तिने फायनलमध्ये प्रवेश केला होता. (Commonwealth Games 2026)

जॅस्मिन लंबोरियाची धडाकेबाज कामगिरी

५७ किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियाने नॉर्दर्न आयर्लंडच्या अनुभवी मिकेला वॉल्शविरुद्ध उत्कृष्ट खेळ दाखवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्या फेरीत जॅस्मिनने ३-२ असा स्प्लिट निकाल आपल्या बाजूने लावला. दुसऱ्या फेरीत जोरदार कमबॅक करत तिने सामन्यावर पकड मिळवली आणि अखेर ५-० अशा दणदणीत फरकाने विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. (Commonwealth Games 2026)

पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानावर

दहाव्या दिवशी मिळवलेल्या या ऐतिहासिक यशानंतर भारत पदक तालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Commonwealth Games 2026)

भारताची एकूण पदके (२५): ७ सुवर्ण, १० रौप्य (रजत) आणि ८ कांस्य पदके.

तालिका अग्रस्थान: ऑस्ट्रेलिया १३२ पदकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर