ठाणे : (Thane Patrakar Bhavan) ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी 30 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा पत्रकार संघाच्या भवनाची जागा गैरव्यवहार आणी शर्तभंग झाल्यामुळे शासनाच्या ताब्यात असून सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली. (Thane Patrakar Bhavan)
याबाबत तात्काळ बावनकुळे यांनी येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या धर्तीवर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निर्देश दिले.(Thane Patrakar Bhavan)
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार,सेक्रेटरी राजीव डाके सदस्य अमर राजभर,निकेश शार्दुल,गजानन हरिमकर, नितीन दूधसागर,सारिका साळुंखे, जेष्ठ पत्रकार माजी अध्यक्ष कैलास म्हापदी, ज्येष्ठ छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस,अनिल शुक्ला, गणेश भोईटे, उपस्थित होते. (Thane Patrakar Bhavan)