सेउटा (Spain Morocco Border Tensions) : उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को आणि स्पेन यांच्यातील सीमेलगत असलेल्या सेउटा या स्पेन-शासित प्रदेशात बेकायदेशीर घुसखोरीचे संकट उभे राहिले आहे. मोरोक्कोहून हजारो स्थलांतरितांनी सीमा ओलांडून स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्पेन प्रशासनाने घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सेउटा हा आफ्रिका खंडात असला तरी तो स्पेनचा भाग आहे. त्यामुळे तो युरोपियन युनियनच्या (EU) बाह्य सीमांपैकी एक मानला जातो. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील अनेक नागरिक युरोपमध्ये रोजगाराच्या आणि आर्थिक संधींच्या शोधात या मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. (Spain Morocco Border Tensions)
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे दोन ते तीन हजार स्थलांतरितांनी सीमेकडे धाव घेतली. काहींनी सीमावरील कुंपण पार केले, तर अनेकांनी समुद्रातून पोहत किंवा ट्यूबच्या सहाय्याने सेउटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीमावर्ती भागात एकच खळबळ उडाली.
Thousands of migrants illegally entered Spain from neighboring Morocco, they came in via land and sea. Many are asking to declare a state of national emergency in view of a breach of security. pic.twitter.com/ggDZyFwPQa
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच स्पेन सरकारने अतिरिक्त पोलीस, सिव्हिल गार्ड आणि लष्करी जवानांची तातडीने तैनाती केली. सीमावर्ती भागात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच, स्पेन सरकारने या घटनेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकही बोलावली आहे. (Spain Morocco Border Tensions)
Thousands of migrants continue crossing from Morocco into Spain's Ceuta enclave. Local officials are urging Madrid to declare a national emergency. pic.twitter.com/MnHgV2Ez30
आफ्रिकेतील आर्थिक संकट, बेरोजगारी, राजकीय अस्थिरता आणि मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अशा प्रकारच्या स्थलांतराच्या घटना वाढत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा युरोपमधील सीमा सुरक्षा आणि बेकायदेशीर स्थलांतर या मुद्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे. (Spain Morocco Border Tensions)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.