मुंबई: ( Ram Kapoor)प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेता राम कपूर सध्या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'लॉक अप: सच या सझा' मुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, यावेळी तो त्याच्या खेळातील कामगिरीमुळे नव्हे, तर शोची सूत्रसंचालक आणि दिग्दर्शिका फराह खान सोबत केलेल्या गैरवर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका टास्कदरम्यान राम कपूरने फराह खानवर ओरडत, मोठ्या आवाजात उत्तर दिल्याने सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे
नेमकी काय घडली घटना?
शोमधील एका टास्क दरम्यान, स्पर्धकांच्या समर्थकांना कुटुंबीय आणि मित्रांना त्यांना पुढील एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी मदत करायची होती. यावेळी राम कपूरची पत्नी गौतमी कपूर देखील तिथे उपस्थित होती. टास्क सुरु असताना राम कपूर वारंवार गौतमीला दुसरी स्पर्धक आकांक्षा चौधरी हिला टार्गेट न करण्याची विनंती करत होता.
रामच्या या वारंवार चाललेल्या मध्यस्थीवर फराह खानने त्याला रोखत टोचून विचारले, "मग एक काम कर, ट्रॉफी आताच तिच्या हातात देऊन टाक! जेव्हा सगळे शिल्पा शिंदेच्या विरोधात गेले होते, तेव्हा तू असंच का नाही बोललास?"यावर राम कपूरचा पारा चढला आणि त्याने फराहवर मोठ्या आवाजात ओरडत उत्तर दिले, "कारण शिल्पा माझी शत्रू आहे, पण आकांक्षा नाही! मी माझे सत्य स्वीकारत आहे!" राम कपूरच्या या उद्धट स्वरामुळे फराह खान अत्यंत नाराज झाल्याचे दिसून आले. Ram Kapoor
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
हा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी राम कपूरच्या या वर्तनावर कडाडून टीका केली आहे:
‘होस्टचा तरी आदर करा’: एका युझरने लिहिले, "फराहने तिच्या चेहऱ्यावर राग दाखवला नाही तरी मला खूप वाईट वाटले. शोच्या सूत्रसंचालकाचा आदर करायला शिकले पाहिजे."Ram Kapoor
‘अजिबात मॅनर्स नाहीत’: दुसऱ्या एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटले, "राम तिच्यावर इतक्या उद्धटपणे ओरडत होता. सूत्रसंचालकाशी कसे बोलावे याचे मूलभूत शिष्टाचारही त्याला माहीत नाहीत. फराहने त्याला यासाठी शिक्षा करायला हवी होती."
‘रेडिटवरील टीका’: रेडिटवरील एका युझरने कमेंट केली, "फराह खान या शोसाठी खूप संयमी आहे. राम कपूरने तिच्यावर असा आवाज चढवलेला पाहून मला त्याचा प्रचंड राग आला."Ram Kapoor
वादांची मालिका
राम कपूरचा या शोमधील वादग्रस्त वर्तनाचा हा पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी पहिल्या आठवड्यात पाण्याच्या मुद्द्यावरून त्याने शोचे सह-सूत्रसंचालक रितेश देशमुख यांच्या सूचना ऐकण्यास नकार दिला होता. दरम्यान, 'लॉक अप'चा हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला असून पुढच्या आठवड्यात महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अशा परिस्थितीत राम कपूरच्या या वर्तनाचा त्याच्या मतदानावर आणि खेळातील प्रवासावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.Ram Kapoor