राहुल गांधींना दंगलखोरांची चिंता? संसद मोर्चादरम्यान पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी राहुल गांधींना प्रश्न विचारताच, "आप BJP के हो क्या?" उत्तर टाळत पत्रकारालाच केला प्रतिप्रश्न
नवी दिल्ली (Rahul Gandhi Police Attack) : दि. २० जुलै २०२६ रोजी दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या 'संसद मोर्चा' आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली, या संबंधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी थेट उत्तर न देता, "भैया, आप BJPके हो क्या?" असा प्रतिप्रश्न करत तेथून निघून गेले.
दरम्यान, शुक्रवारी ३१ जुलै रोजी जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिस गंभीर जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला. एका जखमी पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने सांगितले की, "ड्युटीनंतर वडील घरी आले तेव्हा त्यांचा खाकी गणवेश रक्ताने माखलेला होता." (Rahul Gandhi Police Attack)
#WATCH | Delhi: "Aap BJP ke ho kya," says Lok Sabha LoP Rahul Gandhi after being asked about a press conference by family members of Delhi Police personnel injured during the students' protest pic.twitter.com/JdtL2nddpT
दिल्ली पोलिसांच्या एसीपी यांच्या पत्नी अवनीत कौर यांनीही त्या रात्रीचा अनुभव सांगताना, जखमी अवस्थेतील पतीला पाहून स्वतःसह दोन वर्षांच्या मुलीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगितले. पोलिस अधिकारी हा केवळ गणवेशातील कर्मचारी नसून त्यामागे संपूर्ण कुटुंब असते, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. (Rahul Gandhi Police Attack)
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून हल्ल्यास जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी सरकार आणि तपास यंत्रणांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Rahul Gandhi Police Attack)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.