संजय राऊत, राहुल गांधींची पळपुटे विरोधक म्हणून इतिहासात नोंद होणार! भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका

    31-Jul-2026
 
Navnath Ban on Sanjay Raut Rahul Gandhi
 
मुंबई,(Navnath Ban on Sanjay Raut Rahul Gandhi) : "परीक्षा विधेयक मंजूर होत असताना राहुल गांधी, काँग्रेस आणि संजय राऊत यांनी संसदेतून पळ काढला. यापुढे पेपरफुटी झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शहा यांच्या नेतृत्वात दहापट शिक्षा आणि दहापट दंड वसूल केला जाणार आहे. असे ऐतिहासिक विधेयक मंजूर होत असताना विरोधकांनी पळ काढला. कारण तुम्हाला या देशातील विद्यार्थ्यांचे हित नको आहे. तुम्हाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि राहुल गांधींचे हित हवे आहे. देशाच्या इतिहासात तुमची नोंद पळपुटे विरोधक म्हणून केली जाणार आहे." अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.३१ रोजी विरोधी पक्षांची निर्भत्सना केली.(Navnath Ban on Sanjay Raut Rahul Gandhi)
 
भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
"अभिजीत दीपके यांचा विष्णूचा अवतार म्हणून गौरव करत देव-देवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला कीव येत आहे. जनाब संजय राऊत, तुम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव आली नाही का? पुणेकरांनी अमितभाई शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार देत गौरव करण्याचा निर्णय घेतला तर संजय राऊत यांच्या पोटात का दुखते? अमितभाई शहा यांचे कर्तृत्व काय आहे, हे देशाने पाहिले आहे. संजय राऊतांना लोकमान्य टिळक यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. कारण तुम्ही आता राहुल गांधींची गुलामी करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानचे भक्त नाही. सोनिया गांधींचे गुलाम म्हणून काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. तुम्हाला भांडुपच्या गाढव नाक्याचाही पुरस्कार दिला जात नाही त्याबद्दल आत्मपरीक्षण करा."असे बन यांनी सुनावले. (Navnath Ban on Sanjay Raut Rahul Gandhi)
 
"संजय राऊत, ईस्ट इंडिया कंपनीची तुलना भाजपासोबत करताना आपण भ्रष्ट इंडिया कंपनीत आहात, याची जाणीव ठेवा. कारण तुमची इंडिया आघाडी भ्रष्ट असल्याने जनतेने तुमचे नामकरण ‘भ्रष्ट इंडिया कंपनी’ असे केले आहे. आपण स्वतः भ्रष्ट इंडिया कंपनीचे चालक - मालक आहोत, याचे भान भाजपावर टीका करताना बाळगा. ईस्ट इंडिया कंपनीला या देशातून हाकलण्याचे काम देशातील नागरिकांनी केले. आणि तुमच्या भ्रष्ट इंडिया कंपनीला घालवण्याचे, नाकारण्याचे आणि घरी बसवण्याचे कामही देशातील जनतेने केले आहे." असे बन म्हणाले.(Navnath Ban on Sanjay Raut Rahul Gandhi)
 
 
 
 




संबंधित मजकूर