काँग्रेस नेते भाई जगताप यांनी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी! - नवनाथ बन

    31-Jul-2026
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "पी.आय. बी. फॅक्ट चेक आणि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, दिल्ली पोलिसांचे डी सी पी सुमित झा यांच्या राजीनाम्याचा दावा करणारा व्हिडिओ हा ए. आय. - जनरेटेड आणि पूर्णपणे बनावट आहे. अधिकृत यंत्रणांनी याबाबत जनतेला सावधही केले आहे.असं असताना काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून जनतेची दिशाभूल केली आहे. (Navnath Ban)
 
त्यांनी तात्काळ तो व्हिडिओ हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी." अशी मागणी भाजप प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.३१ रोजी केली आहे. (Navnath Ban)
 
"जाणूनबुजून खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणात कायदेशीर तरतुदींनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण फेक ए आय व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक कधीही खपवून घेतली जाणार नाही." असेही बन यांनी आपल्या सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. (Navnath Ban)
 
 




संबंधित मजकूर