कल्याण-डोंबिवलीत वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक

सीसीटीव्ही यंत्रणा बळकट करण्यासह कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील २७ गावे व टिटवाळा परिसरासह विशेष लक्ष

    31-Jul-2026
Kalyan Dombivli Crime
 
कल्याण : (Kalyan Dombivli Crime) कल्याण-डोंबिवलीकरांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणा सरसावली असून, सीसीटीव्हीचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी गुरुवारी दोन्ही प्रशासनांची संयुक्त बैठक पार पडली.
 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापौर अॅड हर्षाली चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक गुरुवार, दि.३० जुलै २०२६ रोजी संपन्न झाली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Kalyan Dombivli Crime)
 
सदर बैठकीत विशेषतः २७ गाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या भागात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था बळकट करणे, संशयित हालचालींवर सतत लक्ष ठेवणे आणि नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले. (Kalyan Dombivli Crime)
 
शहरातील सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. नव्या डीपीआर नुसार आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. तसेच सध्या नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करून त्यांना महापालिकेच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आपत्कालीन कक्षाशी थेट जोडण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. यामुळे शहरासह २७ गाव परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. (Kalyan Dombivli Crime)
 
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही बैठकीत प्राधान्याने घेण्यात आला. शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्या तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष कारवाई करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
 
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थ व व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच टिटवाळा परिसरातील गांजा, चरस, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी यांची विक्री तसेच सेवक करणाऱ्यांवर कठोररित्या कारवाई करावी. यावेळी महापौरांनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून विशेषतः २७ गाव परिसरासह संपूर्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी व ठोस उपाययोजना राबविण्यात येतील, असे स्पष्ट केले. (Kalyan Dombivli Crime)
 
सदर बैठकीस महापौर अॅड. हर्षाली चौधरी, आयुक्त, अभिनव गोयल, उपमहापौर, राहूल दामले, गटनेता (भाजप), शशिकांत कांबळे, गटनेता उबाठा उमेश बोरगावकर, गटनेता (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) कांचन कुलकर्णी, कुणाल पाटील (नगरसेवक), महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त प्रसाद बोरकर, विराज लबडे, सुषमा मांडगे, तसेच पोलिस प्रशासनातील सहा. पोलिस आयुक्त, अशोक होनमाने, वरीष्ठ पोलिस निरिक्षक संदीपन शिंदे, राजेंद्र खेडेकर, मुकेश ढगे, बळीरामरसिंग परदेशी इत्यादी अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Kalyan Dombivli Crime)
 
महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शहरातील नादुरूस्त असलेले कॅमेरे दुरूस्ती करणे तसेच नविन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था आणि अधिक सक्षम करणे. २७ गाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील बेकायदेशीर व हानिकारक व्यवसायांवर कारवाई करणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने लवकरच पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. (Kalyan Dombivli Crime)
 
 




संबंधित मजकूर