सांगली : (Chandrakant Patil) दिल्ली पोलिसांनी आंदोलनासंदर्भात फार मोठा रिपोर्ट तयार केला असून, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. पोलिसांनी आंदोलन स्थळावरचे दगड जमा केले असून आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सांगली येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफीची माहिती दिली. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलानात झालेल्या लाठीचार्जवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, तुम्हीदेखील आरोप करू शकता, ते तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. आरोप केला म्हणजे तो खरा असतो असे नाही.(Chandrakant Patil)
आरोप केल्यानंतर त्यांनी केलेली मागणी पूर्ण होणे हे तथ्यांशी जोडलेले असावे. दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. पोलिसांनी ज्यांना पकडले ते कोणकोणत्या गुन्ह्यात होते, याचे पोलिसांनी विश्लेषण केले आहे. एका पत्रकाराने त्यांच्या व्हिडिओत माहिती दिल्याचे सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून अॅडव्हान्स तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले." (Chandrakant Patil)
ते पुढे म्हणाले की, "या व्हिडिओतील माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, जंतरमंतर परिसरात पडलेले प्रत्येक दगड उचलले आहेत, त्या दगडावर असणारे साधे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील. एका बाजूने राहुल गांधी अमित शहा यांनी हा लाठीचार्ज करायला लावला, असा आरोप करतात. तर, दुसरीकडे पोलिसांनी त्यांच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांनादेखील सिद्ध करावे लागेल आणि राहुल गांधी यांनादेखील त्यांचे आरोप सिद्ध करावे लागेल," असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....