मुंबई : (Anna Bhau Sathe Memorial) ‘’लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मोठे कौतुक आहे की, जगातील 27 भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले आहे. त्यांच्या फकिरातील नायक आजही सामान्य लोकांना लढण्याचे सामर्थ्य देतो. त्यांचे साहित्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. वंचितांचा, पीडितांचा, शोषितांचा आवाज म्हणून प्रत्येक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे कार्य केले आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे.
चिराग नगरला जिथे अण्णाभाऊ साठे यांचे घर होते तिथे स्मारक तयार झाले पाहिजे अशी मागणी गेली 25 वर्षांपासून होत होती. 2016 पासून आम्ही यासाठी प्रयत्न सुरू केला. 2019 च्या फेब्रुवारीत निर्णय घेतला की हा स्मारक प्रकल्प खासगी विकासक नाही तर एसआरए स्वतः करणार आहे. हे स्मारक वंचिताना उद्ध्वस्त करून बांधता येणार नाही. या जागेतील लोकांचे योग्य पुनर्वसन केले,‘’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. 31 जुलै रोजी केले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्यातर्फे उभारण्यात येणार्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या प्रकल्पाचे भूमिपूजन घाटकोपरमधील चिरागनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.(Anna Bhau Sathe Memorial)
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘’संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामान्य तरुणाईला रस्त्यावर आणून चळवळीचा भाग बनवण्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांनी खूप मोठे काम केले. आंदोलनात जखमी झालेले लोक अण्णाभाऊ साठे यांचे काव्य ऐकून प्रेरणा घ्यायचे आणि पुन्हा लढायला उभे राहायचे. आचार्य अत्रे यांनीही त्यांच्या शाहिरीचे भरभरून कौतुक केले आहे.‘’(Anna Bhau Sathe Memorial)
या स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन येऊ असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय दिना पाटील,आमदार अमीत साटम, महापौर रितू तावडे, आमदार राम कदम,आमदार अमीत गोरखे, आमदार दिलीप लांडे, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिळ सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, मनोज कोटक, मिहीर कोटेचा, मुरजीभाई पटेल, राजन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी केले.(Anna Bhau Sathe Memorial)
‘’घाटकोपरमध्ये पडत आहेत पावसाच्या सरी तरी आम्ही आलोय अण्णाभाऊंच्या घरी‘’ असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की,‘’मातंग समाजामध्ये शिक्षण वाढले पाहिजे. अण्णाभाऊ मोठे नेते आणि साहित्यिक होते. फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती. मिलमधील कामगारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सातत्याने संघर्ष केला.‘’(Anna Bhau Sathe Memorial)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘’ महायुतीने वचनपूर्ती केली याचे समाधान असून आजच भूमिपूजन हे अण्णाभाऊंच्या विचारांचे बीज रोवण्याचे पूजन आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील केंद्राचे भूमिपूजन होत आहे हा आनंदाचा दिवस आहे. सामाजिक बदलाचे काम हे केंद्र करेल. हे फक्त स्मारक नसेल तर संशोधनाचे काम इथे होईल ज्यामुळे अण्णाभाऊंचे विचार जगभर पोहोचतील. आमचे सरकार वंचितांसाठी काम करत आहे. अण्णाभाऊंचे ऋण महाराष्ट्र कधी विसरू शिकत नाही.ते केवळ लेखक न्हवते तर परिवर्तनाचे शिल्पकार होते.समतेची परंपरा,सामाजिक न्याय देण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले.‘’(Anna Bhau Sathe Memorial)
या कामाचा सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल भाजप आमदार राम कदम आणि आमदार अमीत गोरखे यांचा विशेष उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहास्तव शाहीर उमप यांनी ’माझी मैना गावाकडे राहिली’ हे गाणे म्हटले.(Anna Bhau Sathe Memorial)
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्यातर्फे तयार केलेल्या कॉफी टेबल बुक चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.(Anna Bhau Sathe Memorial)
वारसदारांचा सत्कार
अण्णाभाऊंची नात ज्योती साठे, सून सावित्रीबाई मधुकर साठे, नातू सचिन साठे, आरती साठे या वारसदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करणारी प्रेरणा कैलास खवले हीचा सत्कार करण्यात आला.(Anna Bhau Sathe Memorial)
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाची वैशिष्ट्ये
20 मीटर उंचीचा भव्य कांस्य पुतळा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासोबत प्रोजेक्शन मॅपिंग (लेझर शो) असणार आहे.
अण्णा भाऊंच्या चिरागनगरमधील मूळ घराचे वाटेगाव येथील घराच्या धर्तीवर जतन केले जाणार आहे. प्रकल्पात 6 मीटर उंच प्रेरणा भिंत उभारली जाणार आहे. या भिंतीवर अण्णा भाऊंचा जीवनपट, म्युरल्स आणि ध्वनि-प्रकाश शो असणार आहे.
प्रकल्पात अत्याधुनिक डिजिटल अनुभव दालन उभारले जाणार आहे. यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हर्चुअल टूर, मेणाचा पुतळा, बहुभाषिक ऑडिओ आणि सेल्फी पॉइंट उभारला जाणार आहे.(Anna Bhau Sathe Memorial)
प्रकल्पात वॉक विथ अण्णा भाऊ संकल्पना राबविण्यात आली आहे. यात वाटेगाव ते मुंबई असा त्यांनी केलेला 255 किमीचा पायी प्रवास दाखवणारे विशेष दालन उभारण्यात येणार आहे.(Anna Bhau Sathe Memorial)
प्रकल्पात अभ्यास आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र आणि अभ्यासिका सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.(Anna Bhau Sathe Memorial)
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी म्फिथिएटर, हरित छत आणि 150 गाड्यांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.(Anna Bhau Sathe Memorial)