केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर

    31-Jul-2026   
 
 
Amit Shah Pune Visit
 
 
मुंबई,( Amit Shah Pune Visit): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, अमित शाह हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले आहेत. ( Amit Shah Pune Visit)
 
टिळक स्मारक न्यासाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ( Amit Shah Pune Visit)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर