मुंबई : (Bantwara 1947) : बॉलीवूड अभिनेते सनी देओल यांचा आगामी चित्रपट 'बंटवारा १९४७' प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण चित्रपटाची कथा नसून नुकताच प्रदर्शित झालेला नवा पोस्टर आहे. ३० जुलै रोजी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कनिका कपूर आणि करण देओल दिसत आहेत. परंतु, या पोस्टरमधील कनिका कपूरचा लूक हुबेहूब कियारा अडवाणी सारखा दिसत असल्याने नेटकरी चांगलेच गोंधळात पडले आहेत. (Bantwara 1947)
सोशल मीडियावर प्रति क्रियांचा पाऊस
करण देओल आणि कनिका कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील आपल्या पात्राचा लूक शेअर केला होता. यात कनिका फ्लॉवर प्रिंटेड सूट, हलक्या तपकिरी रंगाचा दुपट्टा, मिनिमल मेकअप आणि मेसी हेअरस्टाईलमध्ये दिसत आहे. तिने पोस्टर शेअर करत लिहिले, "१४ ऑगस्ट रोजी फाळणी दिनानिमित्त 'बंटवारा १९४७' चित्रपटगृहात नक्की पहा." (Bantwara 1947)
हे पोस्टर समोर येताच कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी तिची तुलना थेट कियारा अडवाणीशी करण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले, "मला एका सेकंदासाठी वाटले की क्रेडिट्समध्ये कियाराचे नाव का नाही?" तर दुसऱ्याने कमेंट केली, "पोस्टरवर कियाराचे नाव लिहायला विसरले की काय?" (Bantwara 1947)
काही युझर्सनी असाही दावा केला आहे की हा पोस्टर कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय वापर करून तयार करण्यात आला आहे. एका युझरने लिहिले, "हा एआय पोस्टर आहे, म्हणूनच ती कियारासारखी दिसत आहे. बॉलिवूड इंडस्ट्री इतकी आळशी कशी झाली आहे?"विशेष म्हणजे, कनिका कपूरच्या इन्स्टाग्रामवरील इतर फोटो पाहिले तर ती कियारासारखी दिसत नाही. कनिकाने स्वतः या तुलनेचा आनंद घेतला असून एका कमेंटवर हसणारा इमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. (Bantwara 1947)
कोण आहे कनिका कपूर?
पार्श्वभूमी: दिल्लीची राहणारी कनिका कपूर 'बंटवारा १९४७' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. (Bantwara 1947)
टीव्ही व वेब शो: याआधी तिने लोकप्रिय टीव्ही मालिका 'एक दुजे के वास्ते २' मध्ये 'सुमन तिवारी'ची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 'दोनो', 'मॉडर्न परिवार' आणि 'मर्डरबाद' सारख्या वेब शोजमध्येही काम केले आहे. (Bantwara 1947)
मॉडेलिंग व सौंदर्य स्पर्धा: कॉलेजच्या दिवसांपासून नाटकांमध्ये काम करणाऱ्या कनिकाने १८ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने 'मिस मूड इंडिगो', 'फेमिना स्टाइल दिवा नॉर्थ' आणि 'मनाप्पुरम मिस क्वीन ऑफ इंडिया' यांसारख्या सौंदर्य स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. (Bantwara 1947)
हा चित्रपट १९८९ च्या असगर वजाहत यांच्या 'जिस लाहोर नै देख्या, ओ जम्या ए नै' या प्रसिद्ध नाटकावर आधारित आहे. चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील एका जोडप्यावर सनी देओल आणि प्रीती झिंटा आधारित आहे. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांना एक मोठी हवेली मिळते, जिथे त्यांना एका हिंदू वृद्ध स्त्रीला (शबाना आझमी) आश्रय द्यावा लागतो. (Bantwara 1947)
जवळपास ३० वर्षांनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. याआधी त्यांनी 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक' यांसारखे अजरामर चित्रपट दिले आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'लाहोर १९४७' असे ठेवण्यात आले होते, परंतु नंतर ते बदलून 'बंटवारा १९४७' असे करण्यात आले. (Bantwara 1947)