शहरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य - सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

    30-Jul-2026
Prakash Abitkar
 
मुंबई : (Prakash Abitkar) "राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलले असून आयुक्तालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय आणि धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत." अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
 
‘शहरी आयुक्तालयाच्या प्रशासकीय संरचना’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या आढावा बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, अतिरिक्त अभियान संचालक जगन्नाथ वीरकर, सहसंचालक दीप्ती देशमुख-पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Prakash Abitkar)
 
मंत्री आबिटकर म्हणाले की, "शहरस्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उणिवा दूर कराव्यात आणि प्रत्येक स्तरावर समाधानाभिमुख कार्यपद्धती स्वीकारावी ही योजना असून वेगाने वाढणाऱ्या शहरी लोकसंख्येच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेचा व्यापक आराखडा तयार केला आहे." (Prakash Abitkar)
 
"राज्यात सध्या २९ महानगरपालिका आणि ३९९ नगरपरिषदा, नगरपंचायती व कटकमंडळे अशा एकूण ४२८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सेवा विस्ताराचे काम सुरू आहे. या क्षेत्रांमध्ये २,९३२ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व ‘आपला दवाखाना’, ८१८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४४ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे तसेच इतर १०५ आरोग्य संस्था कार्यरत आहेत." असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.(Prakash Abitkar)
 
" नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १,०४१ वरून २,००६ पर्यंत वाढली असून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांची संख्या ४३२ वरून ६७४ पर्यंत पोहोचली आहे. एकूण कार्यान्वित नागरी आरोग्य संस्थांची संख्या २,५३८ वरून ३,७६७ इतकी झाली आहे.
 
शहरी आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता मानकांनुसार पायाभूत सुविधा विकसित करणे, रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरणे, समुदाय सहभाग वाढविणे, जनआरोग्य समित्या आणि महिला आरोग्य समित्यांना सक्रिय करणे, आरोग्यदूत संकल्पना राबविणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आरोग्य सेवांचे प्रभावी नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे."असे मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.(Prakash Abitkar)
 
 




संबंधित मजकूर