'X वर 'द ऑडिसी' चित्रपट लीक; हटवण्यापूर्वीच लाखो व्ह्यूज...

christopher
 
लॉस एंजिलीस:  ( The odyssey Movie Leaked ) हॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट 'द ऑडिसी' डिजिटल पायरसीचा बळी ठरला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या चित्रपटाची उच्च दर्जाची (एच डि) पायरेटेड कॉपी अपलोड करण्यात आली, ज्याला हटवण्यापूर्वी तब्बल २१ लाखांहून (२.१ दशलक्ष) अधिक व्ह्यूज मिळाले. २ तास ५३ मिनिटांचा हा संपूर्ण चित्रपट सोशल मीडियावर लीक झाल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
 
नेमकं काय घडलं?
 
शनिवारी एका अज्ञात युझरच्या अकाऊंटवरून ७० मिमी आयमॅक्स फॉरमॅटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची उच्च दर्जाची प्रिंट 'X' वर पोस्ट करण्यात आली.अवघ्या अडीच तासांत २१ लाख व्ह्यूज: हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अवघ्या अडीच तासांच्या आत तब्बल २.१ दशलक्ष लोकांनी तो पाहिला आणि मोठ्या प्रमाणावर रीपोस्ट केला. पायरसीची तक्रार मिळताच 'X' प्रशासनाने कॉपिरायट उल्लंघनाचा नियम लावून तो व्हिडिओ हटवला आणि संबंधित युझरचे अकाऊंट निलंबित केले. (The odyssey Movie Leaked )
 
युनिव्हर्सल पिक्चर्सची आक्रमक भूमिका
 
या घटनेवर चित्रपटाची निर्मिती आणि वितरण कंपनी युनिव्हर्सल पिक्चर्स ने तीव्र संताप व्यक्त केला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. "आम्हाला चित्रपटाच्या अनधिकृत पोस्टिंगची माहिती मिळताच आम्ही तात्काळ 'टेकडाऊन' प्रक्रिया सुरू केली. आम्ही कॉपिरायटचे उल्लंघन गांभीर्याने घेतो आणि आमच्या बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक कायदेशीर पावले उचलू. (The odyssey Movie Leaked )
 
बॉक्स ऑफिसवर 'द ऑडिसी'चा धुमाकूळ कायम
 
क्रिस्टोफर नोलन हे नेहमीच प्रेक्षकांनी त्यांचे चित्रपट थिएटरमधील मोठ्या पडद्यावर पाहण्यावर भर देतात. 'द ऑडिसी' हा चित्रपट होमरच्या प्रसिद्ध ग्रीक महाकाव्यावर आधारित असून त्यात मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, आणि झेंडया यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान, चित्रपट ऑनलाईन लीक झाला असला तरी त्याचा बॉक्स ऑफिसवरील कमाईवर फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ६४० दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे ५,३०० कोटी रुपये) गल्ला जमवला असून तो तुफान यशस्वी ठरत आहे. (The odyssey Movie Leaked )
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर