'रामायण'च्या भव्य ट्रेलरने चित्रपटसृष्टीत उत्सुकता वाढली: भूमी पेडणेकर, जॅकी भगनानी आणि झोया अख्तरसह अनेक कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव!

ramayana

मुंबई:  (Ramayana Part 1 Trailer )दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'रामायण: पार्ट १' या महासिनेमाचा ट्रेलर आज ३० जुलै रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर (पहाटे ४:१५ वाजता) जगभरात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून, सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण या व्हिज्युअल वंडरच्या प्रेमात पडले आहेत.
 
प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, माता सीतेच्या रुपात साई पल्लवी आणि लंकेश रावणाच्या रुद्रावतारात साऊथ सुपरस्टार यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच झलकित प्रेक्षकांचे डोळे दीपवले आहेत.  (Ramayana Part 1 Trailer )

ट्रेलरमध्ये काय आहे खास?
 
सुमारे ४ मिनिटांच्या या भव्य ट्रेलरची सुरुवात साऊथ स्टार यशच्या रावणाने होते. "तीन्ही लोकांवर एकच राज असेल रावण राज!" या त्याच्या डरकाळीने लंकाधिपतीच्या भव्यता आणि ताकदीची प्रचिती येते.यानंतर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या जन्माची आणि अवताराची कथा उलगडते. जुन्या 'रामायण' मालिकेतील लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल यामध्ये राजा दशरथाच्या भूमिकेत दिसत आहेत.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभू श्रीराम आणि सीतेचा विवाह, १४ वर्षांचा वनवास आणि सीतेचे हरण यांसारखे महत्त्वाचे प्रसंग अत्यंत प्रभावी व्हिज्युअल इफेक्ट्ससह दाखवण्यात आले आहेत. ट्रेलरच्या शेवटी रणबीर कपूरचा "रावण तिन्ही लोकांचा राजा असला तरी त्याला त्याचा मृत्यू तिन्ही लोकांसमोरच स्वीकारावा लागेल" हा संवाद प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा आहे.  (Ramayana Part 1 Trailer )
 
 
 
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
 
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या:  (Ramayana Part 1 Trailer )
 
भूमी पेडणेकर: भूमीने इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत लिहिले, "हे खरोखरच भव्य आणि अद्भुत आहे! हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 'रामायण' जागतिक पातळीवर इतिहास रचणार आहे."  (Ramayana Part 1 Trailer )
 
जॅकी भगनानी: चित्रपटात शूर्पणखेची भूमिका साकारणाऱ्या रकुल प्रीत सिंगचा पती जॅकी भगनानीने लिहिले, "माझे बंधू अमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी सर, हे महाकाव्य पडद्यावर जिवंत केल्याबद्दल तुमचे अभिनंदन! रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश खरोखरच अप्रतिम आहेत. आणि माझी पत्नी रकुल, शूर्पणखेच्या भूमिकेत तुझा स्क्रीन प्रेझेन्स थक्क करणारा आहे!" 
 (Ramayana Part 1 Trailer)

झोया अख्तर: दिग्दर्शिका झोया अख्तरने करण जोहरच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, "करण, आता अजिबात वाट पाहावत नाहीये!"
 
गुणीत मोंगा व अश्विनी अय्यर तिवारी: ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुणीत मोंगा यांनी याला "इनक्रेडिबल" म्हटले, तर नितेश तिवारी यांच्या पत्नी आणि दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनी कमेंटमध्ये रेड हार्ट इमोजी पोस्ट केला.  (Ramayana Part 1 Trailer) 
 
सरगुन मेहता आणि गिप्पी ग्रेवाल: चित्रपटात लक्ष्मण साकारणाऱ्या रवी दुबेच्या या मोठ्या संधीबद्दल पंजाबी स्टार गिप्पी ग्रेवाल आणि रवीची पत्नी सरगुन मेहता यांनी आनंद व्यक्त केला. सरगुनने लिहिले, "सत्याच्या युगाची नवी पहाट झाली आहे. जय श्री राम'हा भारतीय सिनेमाचा जगभरातील नवा आरंभ आहे."  (Ramayana Part 1 Trailer)
 
नवीन पोलिशेट्टी: 'छिछोरे' फेम अभिनेत्याने नितेश तिवारींचे कौतुक करत या चित्रपटाला एक "अद्भूत आणि ऐतिहासिक प्रवास" असे संबोधले.  (Ramayana Part 1 Trailer)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर