मुंबई: (Musafir cafe )सध्या ओटीटीवर प्रेम, नातेसंबंध आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणांची कथा सांगणाऱ्या ‘मुसाफिर कॅफे’ या हिंदी रोमँटिक ड्रामा सीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. २४ जुलै २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये विक्रांत मेसी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. या तिघांव्यतिरिक्त आदिल हुसैन, राजीव सिद्धार्थ, अनूभा फतेहपुरिया, लवलीन मिश्रा आणि सदिया सिद्दीकी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत
.कलाकारांच्या भूमिकांवर एक नजर
विक्रांत मेसी (चंदर मोहन शर्मा): विक्रांत मेसीने सीरिजमध्ये चंदर मोहन शर्मा ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. चंदरच्या आयुष्यात प्रेम, करिअर, स्थैर्य आणि स्वतःची स्वप्ने यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्यातील दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर दोन स्त्रिया येतात आणि प्रत्येक नाते त्याला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाते. एका बाजूला स्थिर आयुष्याची इच्छा असणारा चंदर अचानक भेटलेल्या प्रेमामुळे आयुष्याकडे नव्याने पाहू लागतो. त्याची व्यक्तिरेखा या सीरिजचा भावनिक केंद्रबिंदू आहे.(Musafir Cafe )
वेदिका पिंटो (सुधा): अभिनेत्री वेदिका पिंटो हिने सुधाची भूमिका साकारली आहे. सुधा ही स्वतंत्र विचारांची, महत्त्वाकांक्षी आणि स्वतःच्या अटींवर जगणारी एक घटस्फोट-विशेषज्ञ वकील आहे. चंदर आणि सुधाची भेट त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरते. दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले तरी त्यांच्या आयुष्याच्या दिशा आणि ध्येये वेगळी असतात. सुधाच्या पात्रातून प्रेमासोबतच करिअर आणि स्वतःची स्वप्ने जपण्याचा विचार मांडला गेला आहे.(Musafir Cafe )
महिमा मकवाना (प्रीती): महिमा मकवाना हिने प्रीतीची भूमिका साकारली आहे. चंदरच्या आयुष्यात प्रीतीचे आगमन एका वेगळ्या वळणावर होते. प्रीतीची व्यक्तिरेखा शांत, समजूतदार आणि संवेदनशील आहे. चंदर आणि प्रीतीच्या नात्यात मोठमोठे नाट्यमय प्रसंग नसून, परस्पर सहवास, विश्वास आणि समजूतदारपणाला महत्त्व दिले गेले आहे. नेटफ्लिक्सनुसार, प्रीती ही शब्दांपेक्षा शांत सहवासातून प्रेम व्यक्त करणारी व्यक्तिरेखा आहे.(Musafir Cafe )
आदिल हुसैन व राजीव सिद्धार्थ: दिग्गज अभिनेता आदिल हुसैन या सीरिजमधील महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक आहेत. तसेच राजीव सिद्धार्थ यांच्या भूमिकेमुळे कथानकाचा अधिक विस्तार होण्यास मदत होते. अनूभा फतेहपुरिया, लवलीन मिश्रा आणि सदिया सिद्दीकी या तिन्ही अभिनेत्रींच्या भूमिकेमुळे सीरिजमधील कथानकाला अधिक व्यापकता आणि खोली मिळते.(Musafir Cafe )
दिग्दर्शन आणि निर्मिती
दिग्दर्शन: रुचिर अरुण
निर्मिती व लेखन: शरण्या राजगोपाल
मूळ कथा: दिव्या प्रकाश दुबे यांच्या ‘मुसाफिर कॅफे’ या लोकप्रिय हिंदी कादंबरीवर आधारित.
निर्मिती संस्था: टेरिबली टायनी टेल्स आणि होम मेड स्टोरीज(Musafir Cafe )
प्रेमाच्या चौकटीपलीकडची कथा
‘मुसाफिर कॅफे’मध्ये प्रेमकथेचा पारंपरिक फॉर्म्युला न वापरता नात्यांमधील गुंतागुंत, योग्य वेळ, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यात अनपेक्षितपणे भेटणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव यावर भर देण्यात आला आहे. भोपाळ आणि मसुरीच्या पार्श्वभूमीवर चंदर, सुधा आणि प्रीती यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडत जातो. एकूण ८ भाग असलेला ‘मुसाफिर कॅफे’चा पहिला सीझन नेटफ्लिक्सवर धुमाकुल घालत आहे.(Musafir Cafe )