मुंबई : (Air India Building) राज्याच्या कारभार लवकरच ऐतिहासिक 'एअर इंडिया' इमारतीतून चालणार आहे. नरिमन पॉईंट येथील 'एअर इंडिया'च्या २३ मजली इमारतीचे नूतनीकरण वेगाने सुरू असून, येत्या काही महिन्यांत २३व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे नवे कार्यालय, अत्याधुनिक मंत्रिमंडळ बैठक हॉल आणि राज्य सरकारचे अनेक महत्त्वाचे विभाग या इमारतीतून कार्यरत होणार आहेत. त्यामुळे मंत्रालयावरील जागेचा ताण कमी होण्याबरोबरच भाड्याच्या कार्यालयांवरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चालाही मोठा आळा बसणार आहे.(Air India Building)
मंत्रालयात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने राज्य सरकारचे अनेक महत्त्वाचे विभाग सध्या बाहेर भाड्याच्या जागेत चालवले जातात. दरम्यान, १९७२ मध्ये उभारण्यात आलेल्या एअर इंडियाच्या ऐतिहासिक २३ मजली इमारतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर १ हजार ६०१ कोटी रुपयांना ही इमारत खरेदी करण्यात असून या इमारतीच्या नुतनीकरणासाठी शासनाने पुरवणी मागण्यांद्वारे १८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या इमारतीवर आता 'महाराष्ट्र शासन' असा नामफलकही लावण्यात आला आहे.(Air India Building)
नवीन इमारतीत कोणते विभाग असणार?
आरोग्य भवन, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता यांसारखे सर्व विभाग एअर इंडियाच्या इमारतीत असणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून पुढील येत्या काही महिन्यातच हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.(Air India Building)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....