ठाणे: (Dharamveer Anand Dighe) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आज तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.(Dharamveer Anand Dighe)
यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Dharamveer Anand Dighe)