मुंबई : ( Devendra Fadnavis) लोकसभेत 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026' मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करत या निर्णयाचे स्वागत केले. पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारने 'झीरो टॉलरन्स' धोरण स्वीकारल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरील आपल्या संदेशात फडणवीस म्हणाले की, या महत्त्वपूर्ण सुधारणेला पाठिंबा देणाऱ्या सर्व खासदारांचे आणि राजकीय पक्षांचे आभार. एनडीए सरकार देशातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून गुणवत्तेला न्याय देणे, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करणे तसेच प्रत्येक पात्र विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित करणे ही सरकारची सर्वोच्च बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.(Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या विधेयकामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात विशेष जलदगती न्यायालये, कालबद्ध तपास, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि जलद अपील यंत्रणा यांसारख्या तरतुदी लागू होणार आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर आणि तातडीची कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Devendra Fadnavis)
फडणवीस यांनी या विधेयकाला भारताच्या परीक्षा व्यवस्थेची विश्वसनीयता, पारदर्शकता आणि निष्पक्षता अधिक बळकट करणारे ऐतिहासिक पाऊल असे संबोधले. तसेच, या कायद्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे संरक्षण होऊन परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.(Devendra Fadnavis)