विद्यार्थ्यांच्या कष्टांचे संरक्षण होईल; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; लोकसभेतील सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकावर प्रतिक्रिया

    30-Jul-2026   
Public Examination Reform Bill 2026
 
मुंबई : (Public Examination Reform Bill 2026) लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, २०२६ मंजूर होणे हा देशातील प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टांचे संरक्षण होईल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
आपल्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालून पारदर्शक, विश्वासार्ह आणि गुणवत्ताधिष्ठित परीक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उचललेले हे एक दूरदृष्टीपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल आहे." (Public Examination Reform Bill 2026)
 
ते पुढे म्हणाले की, "या विधेयकामुळे विशेष जलदगती न्यायालये, कालबद्ध तपास, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि जलद अपील यंत्रणा यांद्वारे पेपरफुटी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि जलद न्याय सुनिश्चित केला जाणार आहे.
 
त्यामुळे प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे संरक्षण होईल आणि देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल. भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, याची ही ठोस प्रचिती आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच या विधेयकाला समर्थन देणाऱ्या सर्व लोकसभा सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार." (Public Examination Reform Bill 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर