खड्ड्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी...

वाहतूक पोलीसानीही खड्ड्यांपुढे टेकले हात..

    29-Jul-2026
Thane Traffic Kondi)
 
ठाणे : (Thane Traffic Kondi) नेमेची येतो मग पावसाळा आणि पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या...ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या पावसाळ्यात खड्डे प्रश्न म्हणजे पाचवीलाच पुज्ल्याचे दिसून येत आहे.. जुलै मध्ये पावसाने विक्रमी कामगिरी केल्याने ठाणे जिल्ह्यांतील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या हि विक्रमी झाल्याचे दिसून येत आहे.. प्रचंड खड्डे आणि त्यावर वाहनांचा भार वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर दररोज सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे... अनेक मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबई, ठाणे, भिवंडी, वसई-विरार, बोरिवलीच्या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
 
अनेक शहरातील वाहतूक कोंडीने एम्ब्युलन्स, विद्यार्थ्यांच्या बसदेखील वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे आणि खराब नियोजन यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येमुळे वाहनचालक, नोकरदार आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले असून प्रवासाचा वेळ व इंधन वाया जात आहे.(Thane Traffic Kondi)
 
कल्याण-शिळ मार्गावर रोजच वाहतूक कोंडीचा ताप ... ४ किलोमीटरसाठी २ तासांचा खोळंबा
 
कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून आता ही समस्या केवळ काटई नाका किंवा मानपाडा चौकापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर कल्याणफाटा, डायघर, पडले आणि शिळफाटा परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून दररोज असंख्य वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.या मार्गाने दररोज नवी मुंबई आणि मुंबईला जाणार्या प्रवाशांचा तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने खोळंबा होत आहे.(Thane Traffic Kondi)
 
मुख्य कारणे आणि प्रभावित परिसर
 
-घोडबंदर मार्ग: खड्डे आणि अवजड वाहनांच्या भारामुळे चेना पूल ते सासूपाडा व करपे कंपाऊंड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
 
-मुंबई-नाशिक महामार्ग व भिवंडी: भिवंडीतील पिंपळास, कशेळी, काल्हेर आणि अंजुरफाटा परिसरात खड्डे व रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक अतिशय संथ ठाणे शहर अंतर्गत
 
मुंबई नाशिक महामार्ग : माजिवडा, कापूरबावडी आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहन बिघडल्यामुळे नागरिकांना आणि नोकरदार वर्गाला मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे.
 
कल्याण शिळ मार्ग – शिळ फाटा जंक्शन वर दिवसाला १ लाख पेक्षा अधिक वाहने...वाहनांचा प्रचंड भार त्यात रस्त्याला प्रचंड खड्डे..
 
खड्ड्यांपुढे वाहतूक पोलीसही हतबल
 
ठाणे जिल्ख्यात वाहनांची प्रचंड संख्या त्यात खड्डयांची समस्याने वाहतूक पोलीस अक्षरशा मेटाकुटीला आले आहेत..जिल्यातील सर्व यंत्रणांनी तातडीने रस्त्यावरील खड्डे प्रश्न निकाली लावावा असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे..
 
“ प्रामुख्याने वाढलेली वाहनांची प्रचंड संख्या आणि त्यात आता खड्डे यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांत दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.. यंत्रणांना खड्डे बुजवण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत त्याप्रमाणे जिल्हातील बर्याच ठिकाणचे खड्डे बुजवले गेले आहेत मात्र पावसाचा जोर इतका आहे कि पुन्हा खड्डे होत आहेत..प्रामुख्याने मुंब्रा बायपास,पनवेल मुंब्रा हायवे ,पाईप लाईन रस्ता याठिकाणी वारंवार खड्डे होत आहेत..शिळ फाटा जंक्शनची कॅपेसिटी संपलेली आहे इथून मिनिटाला हजार ते दीड हजार वाहने जात आहेत त्यामुळे तातडीने उड्डाणपुलाची गरज आहे..”
 
---पंकज शिरसाट,वाहतूक पोलीस उपायुक्त(Thane Traffic Kondi)
 
 




संबंधित मजकूर