नवी दिल्ली: (Rules Changing From August 1st 2026) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होत असतात. १ ऑगस्ट २०२६ पासूनही असेच काही मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर, घरगुती बजेटवर आणि दैनंदिन व्यवहारांवर पडणार आहे. एलपीजी सिलिंडरचे दर, रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचे नवे नियम, CKYC 2.0 ची सुरुवात, आयटीआर लेट फी आणि बँक सेवा शुल्कातील बदलांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. १ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या ८ मोठ्या बदलांचा हा सविस्तर आढावा. (Rules Changing From August 1st 2026)
१. एलपीजी सिलिंडरचे सुधारित दर
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या १४.२ किलोचे घरगुती आणि १९ किलोचे कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर आणि खर्चानुसार १ ऑगस्ट रोजी नवीन दर जाहीर केले जातील. (Rules Changing From August 1st 2026)
२. रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगची नवी प्रणाली
भारतीय रेल्वेने १ ऑगस्टपासून स्टेशनवरील तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. काउंटरवर गर्दी टाळण्यासाठी आता तत्काळ बुकिंग सुरू होताच टोकन दिले जातील. यापूर्वी प्रवाशांना आधी टोकन घ्यावे लागायचे आणि नंतर बुकिंगसाठी पुन्हा स्वतंत्र रांगेत राहावे लागायचे. नव्या नियमामुळे प्रवाशांचा वेळ वाचून प्रक्रिया अधिक सुलभ होईल. (Rules Changing From August 1st 2026)
३. 'CKYC 2.0' प्रणालीची सुरुवात
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि बँकिंग व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी 'सेंट्रल नो-युवर-कस्टमर' म्हणजेच CKYC 2.0 ही प्रमुख डिजिटल ग्राहक ओळख प्रणाली ऑगस्ट महिन्यापासून देशभरात लागू केली जात आहे. यामुळे ग्राहकांना सर्व वित्तीय संस्थांसाठी एकच कॉमन कस्टमर आयडी मिळेल. (Rules Changing From August 1st 2026)
४. बँकांचे सेवा शुल्क अन् क्रेडिट कार्डचे नियम
महिन्याच्या सुरुवातीला विविध बँका एफडी (FD), ईएमआय (EMI) आणि क्रेडिट कार्डचे व्याजदर व सेवा शुल्कात बदल करू शकतात. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने १ ऑगस्टपासून ग्राहकांसाठी प्रति SMS ३० पैसे शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे (यावर मासिक मर्यादा असेल). तसेच डेबिट कार्ड मेंटेनन्स चार्जेसमध्येही सुधारणा होणार आहे. (Rules Changing From August 1st 2026)
५. आयटीआर भरण्यासाठी विलंब शुल्क
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी बिना-दंड आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. १ ऑगस्टपासून आयटीआर फाइल केल्यास १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत विलंब शुल्क (Late Fine) आकारले जाईल. तसेच, ज्या करदात्यांना खात्यांचे ऑडिट करणे बंधनकारक नाही, त्यांनी ITR-3 आणि ITR-4 फॉर्म ३१ ऑगस्ट २०२६ या अंतिम मुदतीपर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. (Rules Changing From August 1st 2026)
६. आरबीआयची पतधोरण बैठक
३ ऑगस्टपासून भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) तीन दिवशीय 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी' (MPC) बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रेपो दराबाबत (Repo Rate) निर्णय घेतला जाईल, ज्याचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जाचे ईएमआय आणि बँकांच्या एफडी व्याजदरांवर होईल. (Rules Changing From August 1st 2026)
७. जीएसटी
व्यापारी आणि दुकानदारांसाठी जीएसटी (GST) नियमांमध्ये मोठे सुधारणात्मक बदल होणार आहेत. (Rules Changing From August 1st 2026)
८. ई-वे बिल प्रणालीत बदल
ई-इनव्हॉइस आणि ई-वे बिल प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी 'बिल-टू-शिप-टू' व्यवहारांसाठी 'शिप-टू-शिप GSTIN' देणे अनिवार्य केले जाईल. तसेच व्यवसायांना स्वेच्छेने ई-वे बिले निष्क्रिय (Deactivate) करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. (Rules Changing From August 1st 2026)