मुंबई : (Reservation Sub Categorization) अनुसुचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. मुंबई बांद्रा पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, यांच्या नेतृत्वात तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार दिनांक 27 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात सोलापुर येथे ; रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी नगर येथे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव;पुणे शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, शैलेश चव्हाण;महिपाल वाघमारे, आदिंच्या नेतृत्वात पुणे शहरात प्रचंड मोर्चा काढुन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र विरोध करण्यात आला.(Reservation Sub Categorization)
तसेच परभणी येथे डॉ. सिध्दार्थ भालेराव डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वात तिव्र निषेध आंदोलन करुन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जळगांव येथे तिव्र निषेध आंदोलन करुन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील नेते रमेश मकासरे आणि जळगावचे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक अनिल अडकमोल आदिंच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करुन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. (Reservation Sub Categorization)
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशाने महाराष्ट्रात सर्व जिल्हयांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनुसुचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तिव्र विरोध करण्यात आलेला आहे.(Reservation Sub Categorization)