नवी दिल्ली: (Priyanka Chopra) अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी बहुचर्चित 'वाराणसी' या चित्रपटाच्या पुढील टप्प्यातील चित्रीकरणासाठी प्रियंका हैदराबादमध्ये दाखल झाली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मॅरी देखील भारतात आले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी बहुचर्चित 'वाराणसी' या चित्रपटाच्या पुढील टप्प्यातील चित्रीकरणासाठी प्रियंका हैदराबादमध्ये दाखल झाली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मॅरी देखील भारतात आले आहेत. (Priyanka Chopra )
विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हैदराबाद विमानतळावरून बाहेर पडतानाचा प्रियंका आणि तिच्या कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये निक जोनास आपल्या चिमुकल्या मालतीला प्रेमाने कडेवर उचलून घेताना दिसत आहे. प्रियंकाच्या या सरप्राइज एंट्रीने तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. 'मंदाकिनी' रूपात प्रियंकाची धमाकेदार एंट्री: अलीकडेच प्रियंकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी या चित्रपटातील तिची 'मंदाकिनी' ही व्यक्तिरेखा आणि तिचे फर्स्ट लुक पोस्टर्स शेअर केले होते. (Priyanka Chopra)
काय असणार आहे वाराणसी चित्रपटात
मुख्य स्टारकास्ट: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत असून प्रियंका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारनयांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
कथानक व जॉनर: हा एक भव्य ॲक्शन अॅडव्हेंचर चित्रपट असून यामध्ये भारतीय पौराणिक कथा, रहस्य आणि टाईम-ट्रॅव्हल / टाइमलाईनशी संबंधित घटकांचा समावेश असणार आहे.
भव्य बजेट: जवळपास ₹१,४०० कोटी इतक्या अथांग बजेटमध्ये तयार होत असलेला हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
प्रदर्शन तारीख: हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Priyanka Chopra)