मुंबई: (musafir cafe) टेरिबली टायनी टेल्स'आणि 'होममेड स्टोरीज' निर्मित 'मुसाफिर कॅफे' ही ८ भागांची सीरिज २४ जुलै रोजी प्रदर्शित झाली. या सीरिजचे दिग्दर्शन रुचिर अरुण यांनी केले आहे. सध्या ओटीटीवर असलेल्या थ्रिलर आणि क्राइम सीरिजच्या गर्दीत एका अत्यंत शांत, हळुवार आणि वास्तववादी प्रेमकथेची मांडणी केल्यामुळे या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Musafir Cafe)
विक्रांत मेस्सीचे सह-निर्माता म्हणून पदार्पण:
अभिनेता विक्रांत मेस्सी याने या सीरिजमध्ये मुख्य भूमिका (चंदर) साकारली असून, त्याने आपल्या 'होममेड स्टोरीज' या बॅनरखाली या सीरिजची सह-निर्मितीही केली आहे. (Musafir Cafe)
कलाकारांचे मानधन
विक्रांत मेस्सी (चंदर): ₹१० ते १५ कोटी
वेदिका पिंटो (सुधा): ₹३ ते ५ कोटी
महिमा मकवाना (प्रीती): ₹२ ते ३ कोटी
आदिल हुसैन (मार्क): ₹३ ते ४ कोटी
कथेत काय आहे खास?
अमेरिकेतील नोकरी सोडून भोपाळमध्ये आलेला 'चंदर' आणि स्वतंत्र विचारांची वकील 'सुधा' यांच्यातील नात्यापासून ही कथा सुरू होते.नात्यात दुरावा आल्यावर चंदर मसुरीमध्ये 'मुसाफिर कॅफे' सुरू करतो, जिथे त्याला 'प्रीती'ची साथ मिळते. वर्षानंतर जुने प्रेम पुन्हा समोर आल्यावर काय घडते, याचा भावनिक प्रवास या सीरिजमध्ये दाखवला आहे. (Musafir Cafe)
माउंटेन लाइफ'ची क्रेझ:
मसुरीच्या निसर्गरम्य वातावरणात शूटिंग झालेल्या या सीरिजमुळे नेटिझन्समध्ये पर्वतांमध्ये कॅफे सुरू करण्याच्या स्लो लिव्हिंग कल्पनेला पुन्हा उधाण आले आहे. (Musafir Cafe)