राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; शैला ए. यांच्याकडे वस्त्रोद्योग विभागाची जबाबदारी;

प्रेरणा देशभ्रतार एमएसएमई आयुक्त, विकास पानसरे पर्यटन संचालक

IAS Officer Transfers
 
मुंबई : (IAS Officer Transfers) राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने दि. 28 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील आदेश काढले.
 
या आदेशानुसार, शैला ए. (IAS 2003 बॅच) यांची नियोजन विभागाच्या सचिव तथा विकास आयुक्त पदावरून बदली करण्यात आली असून त्यांची सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव (वस्त्रोद्योग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(IAS Officer Transfers)
 
प्रेरणा देशभ्रतार (IAS 2010 बॅच) या सध्या मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विकास पानसरे (IAS 2014 बॅच, राज्य सेवा प्रवर्ग) यांची MSSIDCच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून पर्यटन संचालक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील वस्त्रोद्योग, एमएसएमई आणि पर्यटन विभागाच्या प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वाचे बदल झाले आहेत.(IAS Officer Transfers)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर