मुंबई : (Maharashtra Cyber CJP Movement) जंतरमंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डीपफेक आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र सायबरने केला आहे. या प्रकरणात चार दिवसांच्या विशेष मोहिमेत ४२९ सोशल मीडिया पोस्ट्स आणि हँडल्स ओळखून त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली असून, गंभीर प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी दिली.
पत्रकार परिषदेत यादव म्हणाले की, सोशल मीडिया हे माहिती पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम असले तरी काही राष्ट्रविरोधी प्रवृत्ती, अफवा पसरवणारे आणि समाजात अस्थिरता निर्माण करणारे घटक त्याचा गैरवापर करत आहेत. जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान एआय आणि डीपफेकच्या साहाय्याने बनावट व्हिडिओ, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स आणि भडकावू मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आला.(Maharashtra Cyber CJP Movement)
चार दिवसांत 429 संशयास्पद पोस्ट्सची ओळख
महाराष्ट्र सायबरने आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन दिवस आणि आंदोलनानंतरचे दोन दिवस अशा चार दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 429 पोस्ट्स आणि सोशल मीडिया हँडल्स संशयास्पद आढळले. यापैकी 329 हँडल्स (76.7 टक्के) भारतातील, तर 100 हून अधिक हँडल्स परदेशातील असल्याचे आढळले. परदेशातील पोस्ट्स प्रामुख्याने पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या काही भागांतून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.(Maharashtra Cyber CJP Movement)
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पोस्ट्स
भारतातील संशयित पोस्ट्समध्ये 257 इन्स्टाग्राम, 34 एक्स (पूर्वीचे ट्विटर), 23 फेसबुक आणि 15 यूट्यूब पोस्ट्सचा समावेश आहे. परदेशातील पोस्ट्समध्ये 55 इन्स्टाग्राम, 21 एक्स, 17 फेसबुक आणि 7 यूट्यूब पोस्ट्स आढळल्या.(Maharashtra Cyber CJP Movement)
यादव यांनी सांगितले की, पाकिस्तानस्थित एका एक्स (ट्विटर) हँडलवर जंतरमंतर आंदोलनात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अशा कोणत्याही घटनेची अधिकृत नोंद नाही. तसेच मलेशियातील एका इन्स्टाग्राम हँडलवर भारतात दंगल, अराजकता आणि कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा खोटा प्रचार करण्यात आला. या सर्व पोस्ट्स हटविण्यात आल्या असून उर्वरित पोस्ट्स हटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(Maharashtra Cyber CJP Movement)
एआयच्या मदतीने गर्दी वाढवून दाखवली
सायबर विभागाने जंतरमंतर आंदोलनातील गर्दी कृत्रिमरीत्या वाढवून दाखवणाऱ्या एआय-निर्मित व्हिडिओंचाही पर्दाफाश केला. अधिकृत आकडेवारीशी कोणताही संबंध नसताना एआयच्या साहाय्याने कोट्यवधी लोक आंदोलनात सहभागी झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. सायबर विभागाकडे उपलब्ध अत्याधुनिक एआय पडताळणी प्रणालीच्या साहाय्याने व्हिडिओतील लिप-सिंक, हालचाली आणि इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून हे व्हिडिओ बनावट असल्याचे काही सेकंदांतच स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला.(Maharashtra Cyber CJP Movement)
पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही खोटी पोस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारी एक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. ती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट करत संबंधित पोस्ट हटविण्यात आली असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांचे डीपफेक व्हिडिओ
काही केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने त्यांनी कधीही न केलेली वक्तव्ये एआय-आधारित व्हॉइस क्लोनिंग आणि व्हिडिओ मॉर्फिंगद्वारे तयार करून प्रसारित करण्यात आल्याचेही महाराष्ट्र सायबरने उघड केले. यामागे पाकिस्तानस्थित APT-36 (Advanced Persistent Threat) या सायबर गटाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून अशा गटांवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.(Maharashtra Cyber CJP Movement)
'POV' पद्धतीचा अवलंब करा
सोशल मीडियावरील कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी नागरिकांनी POV (Pause, Observe and Verify) म्हणजेच थांबा, निरीक्षण करा आणि पडताळणी करा या तत्त्वाचा अवलंब करावा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. संशयास्पद किंवा बनावट पोस्ट्स 1930 या हेल्पलाइनवर कळवाव्यात. अशा पोस्ट्स तातडीने हटवून संबंधितांविरुद्ध एफआयआरसह कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Cyber CJP Movement)
शिवाजी पार्क आंदोलनाचाही समावेश
या ४२९ पोस्ट्सपैकी सुमारे 20 ते 30 टक्के पोस्ट्स महाराष्ट्राशी संबंधित असून त्यात शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनासंदर्भातील पोस्ट्सचाही समावेश असल्याचे यादव यांनी सांगितले. तसेच ही तपास मोहीम केवळ चार दिवसांची असून तपासाचा कालावधी वाढविल्यास अशा पोस्ट्सची संख्या हजारोंपासून लाखोंपर्यंत जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.(Maharashtra Cyber CJP Movement)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.