महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयासाठी केंद्राकडे प्रस्ताव; दादाजी भुसे यांचे निर्देश

शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

    29-Jul-2026
Dadaji Bhuse
 
मुंबई : (Dadaji Bhuse) "ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालयांच्या शाळा नाहीत तेथे त्या सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिसरातील इतर शाळांमधून प्राथमिक प्रशिक्षण द्यावे, शासकीय विद्यानिकेतनमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत."अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.(Dadaji Bhuse)
 
शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर, कार्यरत व रिक्त पदे याचबरोबर विविध संस्थांच्या इमारतींची सद्यस्थिती, शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाचा वापर, खर्च व शिल्लक निधी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सद्यस्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रक्रिया तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात मंगळवार दि.२९ रोजी आयोजित बैठकीत सविस्तर आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, विभागातील वरिष्ठ अधिकारी; तसेच संबंधित संस्थांचे प्राचार्य आणि कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते.(Dadaji Bhuse)
 
"शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार आहे."असेही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.(Dadaji Bhuse)
 
 




संबंधित मजकूर