कचऱ्यात फेकलेला पार्सलचा बॉक्स बनू शकतो बँक खात्यासाठी धोका! 'कचरा' कसा बनतोय सायबर भामट्यांसाठी सोन्याची खाण? जाणून घ्या बचावाचे सोपे उपाय


नवी दिल्ली: (Online Shopping Fraud Safety) ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मागवलेले पार्सल आल्यानंतर आपण सामान काढून घेतो आणि तो बॉक्स विचार न करता कचऱ्यात किंवा भंगारात फेकून देतो. मात्र, हीच छोटीशी निष्काळजीपणाची सवय तुमच्या बँक खात्यातील जमापुंजी रिकामी करण्याचे कारण ठरू शकते. सायबर तज्ज्ञांच्या मते, फेकून दिलेल्या डिलिव्हरी बॉक्सवर असलेले छोटेसे स्टिकर आणि त्यावर छापलेली तुमची वैयक्तिक माहिती आजकाल सायबर गुन्हेगारांसाठी 'सोन्याची खाण' ठरत आहे. (Online Shopping Fraud Safety)

कसा होतो फसवणुकीचा खेळ?

फेकून दिलेल्या बॉक्सवरील लेबलवर तुमचे नाव, फोन नंबर, संपूर्ण पत्ता, ईमेल आयडी आणि तुम्ही काय खरेदी केले आहे, याची माहिती असते. भामटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून किंवा भंगार विक्रेत्यांकडून हे बॉक्स गोळा करून ही माहिती नोंदवून घेतात. (Online Shopping Fraud Safety)

फसवणूक करणारे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कूरियर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कॉल करतात. त्यांच्याकडे तुमच्या खरेदीची अचूक माहिती असल्याने तुम्हाला तो कॉल खरा वाटतो. कॅशबॅक, लॉयल्टी रिवॉर्ड्स किंवा सवलतीचे आमिष दाखवून ते व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा ईमेलवर फीडबॅक सर्वेक्षणाची लिंक पाठवतात. (Online Shopping Fraud Safety)

लिंकवर क्लिक करताच युझर बनावट वेबसाईटवर पोहोचतो, जिथे बँक डिटेल्स, कार्ड नंबर किंवा ओटीपी मागितला जातो. काही प्रकरणांत फोनमध्ये 'मालवेअर' इन्स्टॉल करून पासवर्ड चोरले जातात आणि खात्यातून पैसे उडवले जातात. (Online Shopping Fraud Safety)

फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

समस्या गंभीर असली, तरी काही साध्या आणि योग्य सवयींमुळे या सायबर धोक्यापासून पूर्ण बचाव शक्य आहे. (Online Shopping Fraud Safety)

पार्सलचा बॉक्स फेकून देण्यापूर्वी त्यावरील स्टॅम्प/लेबल फाडून टाका, कापा किंवा पूर्णपणे खरवडून काढा, जेणेकरून त्यावर लिहिलेली माहिती कोणीही वाचू शकणार नाही. (Online Shopping Fraud Safety)

नावावर किंवा पत्त्यावर रोलर स्टॅम्प मारून ती माहिती कायमची अस्पष्ट करा. (Online Shopping Fraud Safety)

कोणतीही कंपनी फोनवरून थर्ड पार्टी ॲप डाऊनलोड करण्यास, अनोळखी लिंकवर क्लिक करण्यास किंवा बँक तपशील/ओटीपी विचारत नाही. (Online Shopping Fraud Safety)

कोणत्याही कॅशबॅक, रिवॉर्ड किंवा ऑफरची माहिती हवी असल्यास थेट संबंधित कंपनीच्या अधिकृत ॲप (Official App) किंवा वेबसाईटवर जाऊनच पडताळणी करा. (Online Shopping Fraud Safety)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर