ओटावा: (Anahat singh) भारताची अव्वल दर्जाची खेळाडू अनाहत सिंग हिने जागतिक जुनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. जागतिक जुनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. कॅनडामधील 'नायग्रा-ऑन-द-लेक' येथे पार पडलेल्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनाहतने इजिप्तच्या रुक्कया सालेमचा ३-० (११-३, ११-७, ११-९) असा थेट गेम्समध्ये पराभव केला. १८ वर्षांच्या अनाहतने पूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व राखत हे ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. (Anahat singh)
अनाहतचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
पहिली फेरी: ऑस्ट्रेलियाच्या लिली विल्सनविरुद्ध थेट गेम्समध्ये विजय
हाँगकाँगची पुई यिन क्लोई लो आणि मलेशियाची डॉईस ये सान ली यांचा पराभव
उपांत्यपूर्व फेरी: इजिप्तच्या हबीबा रिझकवर ३-१ अशी मात
उपांत्य फेरी: इजिप्तच्या बार्ब सामेहचा ३-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश.
अंतिम सामना: इजिप्तच्या रुक्कया सालेमला ३-० ने नमवत इतिहास रचला.
ऐतिहासिक महत्त्वाचे मुद्दे:इजिप्तच्या वर्चस्वाला ब्रेक:
२०११ पासून या स्पर्धेत इजिप्तच्या खेळाडूंचेच वर्चस्व राहिले होते.
अनाहतच्या या विजयाने इजिप्तची ही १५ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली. (Anahat singh)
जोश्ना चिनप्पाचा विक्रम मोडीत
यापूर्वी २००५ मध्ये जोश्ना चिनप्पाने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते, जो आतापर्यंतचा भारतातील सर्वोत्तम निकाल होता.
अनाहतने सुवर्णपदक जिंकून हा जुना विक्रम मागे टाकला.