मुंबई : (Ravindra Natya Mandir) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग ते आधुनिक’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर लघु नाट्यगृह, प्रभादेवी येथे झालेल्या या कार्यक्रमातून संतवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतच्या संगीताचा सुरेल प्रवास रसिकांसमोर उलगडला गेला.(Ravindra Natya Mandir)
कार्यक्रमात गायक नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी आणि धनश्री देशपांडे यांनी आपल्या सुमधुर गायनातून अभंग, भक्तिगीते, भावगीते तसेच आधुनिक मराठी गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. संतपरंपरेतील अभंगवाणी आणि आधुनिक मराठी संगीत यांचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने रसिकांना दिली.(Ravindra Natya Mandir)
डॉ. समीरा गुजर-जोशी यांनी कार्यक्रमात सुसंवाद साधत प्रत्येक सादरीकरणाची पार्श्वभूमी आणि मराठी संगीतपरंपरेतील त्याचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाला एक अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण परिमाण लाभले.(Ravindra Natya Mandir)
ह्या कार्यक्रमाला मा. महापौर रितूताई तावडे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. तसेच मुंबई भाजपा उपाध्यक्ष किरण शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे उपस्थित होते.(Ravindra Natya Mandir)
“मराठी संगीताचा वैभवशाली वारसा जपणारा आणि संतवाणीपासून आधुनिक गीतांपर्यंतचा सांगीतिक प्रवास उलगडणारा ‘अभंग ते आधुनिक’ हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीचे संवर्धन होण्यास मोठी मदत होते.” असे वक्तव्य मा. महापौर रितूताई तावडे ह्यांनी केले.(Ravindra Natya Mandir)
कार्यक्रमाचे संयोजन स्वरवंती क्रिएशन्स यांनी केले होते. या कार्यक्रमाने मराठी संगीताचा वैविध्यपूर्ण वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, अशी भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.(Ravindra Natya Mandir)