मुंबई : (Uday Samant) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरुढ होऊन मतदारांनी नाकारलेले काही पक्ष स्वत:चे राजकारण करत असून त्यातील एक उबाठा पक्ष आहे, अशी टीका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.(Uday Samant)
मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "ज्यांना महाराष्ट्राने नाकारले त्यांना आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यास आपल्याला पुन्हा एकदा मतदार स्विकारतील असे वाटत असल्याने हा केविलवाणा प्रकार केला आहे. एनडीएतील सगळे पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यातील शिवसेना हा एक मोठा पक्ष आहे. त्यामुळे सकाळच्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवण्याची गरज नाही."(Uday Samant)
ते पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. परंतू, काही लोक आपणच विद्यार्थ्यांचे तारणहार आहोत, अशी भूमिका मांडत आहेत. हे आंदोलन संपल्यानंतर जे खरे नीट परीक्षेचे विद्यार्थी आहेत, त्यांनी आंदोलनात घुसलेल्या पक्षांबाबत सांगितले. फक्त पंतप्रधान मोदी यांना विरोध करण्यासाठी काहीजण या आंदोलनात घुसले, हे विद्यार्थ्यांच्यादेखील लक्षात आले आहे. त्यामुळे हे सगळे डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्यांची पुढची वाटचाल असणार आहे."(Uday Samant)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....