मुंबई,(Shivaji Park Victory Rally Controversy) : नीट- यूजी २०२६ पेपरफूटी व जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवार दि. २५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि याचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी कॉंग्रेस, उबाठा,मनसेसह विरोधकांमध्ये स्पर्धा लागली. कहर म्हणजे उध्दव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या एका खासदारास एक मुलाखत पण दिली.ज्यात या आंदोलनाच्या य़शाचे श्रेय घेण्याचा त्यांनी केवीलवाणा प्रयत्न केला.याच श्रेयवादाचा एक भाग म्हणून ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क,दादर येथे रविवार दि.२६ रोजी तिरंगा विजय जल्लोषाचे आयोजन केले होते. हा विजयाचा जल्लोष की अपप्रवृत्तींचा उन्माद अशी म्हणायची वेळ आली होती. कारण या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर बाहेर पडणाऱ्या तरूण तरूणींच्या घोळक्याने 'आझादी,आझादी' च्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे या घोषणा राज ठाकरे यांच्या घरापासून काही अंतरावरच देण्यात आल्या.यावेळी राज ठाकरेंच्या घराच्या गॅलरीतून या घोषणा कानावर पडून देखील त्याकडे ठाकरे बंधू मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील असे वातावरण तिथे होते.काही तरूण तरूणी तर ज्या अश्लील भाषेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांना शिवीगाळ करत होते व अश्लील हावभाव करत होते.ते पाहून रस्त्यातील ज्येष्ठ नागरिकांनी कानावर आणि डोळ्यावर हातच ठेवले. शेवटी न राहवून एका ज्येष्ठ महिलेने त्या तरूणांना चांगलेच सुनावले."अशी भाषा वापरणे तुम्हाला शोभते का?,तुमच्या आई वडीलांनी तुम्हाला हेच शिकवले का? मी आता पोलीसांना बोलावेन."असे ती महिला म्हणताच त्या घोळक्याने तिथून पलायन केले.(Shivaji Park Victory Rally Controversy)
नवीन शिक्षा मंत्री असे लिहीलेले राखी सावंतचे फोटो असलेले पोस्टर्स काही तरूणांनी हातात घेतले होते. त्याकृतीस पण अनेकांनी नापसंदी दर्शवली.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी करत अनेक तरूणांनी विरोधकांचा छुपा एजेंडाच राबवला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उल्लेख एका मास्क घातलेल्या तरूणाने माध्यमांशी बोलताना टकल्या असे केला.एकूणच एक हातात देशाचे संविधान घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने त्याच संविधानातील तत्त्वांचा अनादर करायचा असा कार्यक्रम सध्या विरोधक देशातील तरुणांना पुढे करून राबवत आहेत.(Shivaji Park Victory Rally Controversy)