पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं...

    28-Jul-2026   
Nationalist Congress
 
मुंबई : (Nationalist Congress) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा आता खुद्द शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत फेटाळून लावल्या आहेत. मंगळवारी, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आणि शरद पवार गटाचा एनडीएला पाठींबा हा विषय चर्चेत आहे. अलीकडेच शरद पवार गटाचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर, सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अधिकच बळावल्या.(Nationalist Congress)
 
दरम्यान, यासंदर्भात शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही," असे ते म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लावल्याचे बोलले जाते.(Nationalist Congress)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर