मुंबई: (Ritesh Deshmukh) प्रसिद्ध अभिनेता आणि रिॲलिटी शो 'लॉक अप २'चा होस्ट रितेश देशमुख सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शोमधील स्पर्धक योगेश रावत याने "माझ्या एक्झिटनंतर शोचा टीआरपी घसरला, म्हणून निर्मात्यांनी मला परत आणलं" असा दावा केला होता. या दाव्यावर रितेश देशमुख प्रचंड भडकला आणि त्याने योगेशची चांगलीच खरडपट्टी काढली.(Ritesh Deshmukh)
नेमकं काय घडलं?
धीरज धूपरला टास्कमध्ये पराभूत करून योगेश रावतने 'लॉक अप २' मध्ये पुन्हा एन्ट्री घेतली होती. घरात परत आल्यावर तो इतर स्पर्धकांशी बोलताना म्हणाला, "माझ्या जाण्यानंतर शोचा टीआरपी पूर्णपणे घसरला होता आणि सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं होतं. त्यामुळे निर्मात्यांना मला परत आणावंच लागलं." योगेशचे हे बोलणे ऐकून होस्ट रितेश देशमुखने थेट जेलमध्ये प्रवेश करत त्याला जाब विचारलं.(Ritesh Deshmukh)
रितेश देशमुखने काय सुनावलं?
रितेशने अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत योगेशच्या उद्धट वर्तनाचा समाचार घेतला,"मी बाहेरून सगळं ऐकत होतो. तू काय म्हणालास? तुला खरंच असं वाटतं का की हा शो फक्त तुझ्यामुळेच चालतो? 'त्यांनी मला बाहेर काढलं, बातमी लीक झाली आणि माझ्या चाहत्यांनी धज्ज्या उडवल्या,' असं तू सांगत फिरतोयस."तू ज्या ॲटिट्यूडमध्ये बोलतोयस ते अत्यंत चुकीचं आहे. तुला मी बाहेर काढलं होतं का? की नेटफ्लिक्सने तुला बाहेर काढलं होतं? तुला कोणी बाहेर काढलं? त्यासाठी टास्क झाला होता ना? मी ठरवलं होतं का तुला बाहेर काढायचं?"(Ritesh Deshmukh)
आम्हाला तुझी गरज नाही!
रितेश देशमुख एवढ्यावरच थांबला नाही. त्याने योगेशला सुनावले की, या शोची ओळख कोणत्याही एका स्पर्धकावर अवलंबून नसते. जेव्हा तू 'त्यांनी' म्हणतोस, तेव्हा त्यात मी येतो, फराह खान येते, नेटफ्लिक्स येतं आणि हा संपूर्ण शो येतो. आम्हाला तुझी अजिबात गरज नाहीये! तुझा हा अहंकार आणि उद्धटपणा इथे चालणार नाही. या कडक शाळा घेण्यानंतर योगेश रावतने रितेश देशमुखची माफी मागितली आणि भविष्यात अशा चुका न करण्याची ग्वाही दिली. रितेशच्या या कडक आणि रोखठोक सूत्रसंचालनाचे सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.(Ritesh Deshmukh)