मुंबई : (Ram Kapoor) रियालिटी शो 'लॉक अप सीझन २' मध्ये प्रसिद्ध अभिनेता राम कपूर याने त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि धक्कादायक खुलासा केला आहे. वडिलांच्या अंतिम दिवसांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शांततेत निरोप घेण्यास मदत केल्याचे रामने सांगितले, ज्यामुळे त्याची आई आणि बहीण गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून त्याच्याशी बोलत नाहीत.(Ram Kapoor)
कर्करोगाशी लढा आणि वडिलांची शेवटची इच्छा
राम कपूरने सांगितले की, त्याच्या वडिलांना वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. १८ कीमोथेरपी सेशननंतर ते कर्करोगमुक्त झाले आणि त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षांपर्यंत उत्तम आयुष्य जगले. मात्र, कोरोनाच्या काळात (COVID-19) त्यांचा कर्करोग पुन्हा बळावला. त्यावेळी त्याचे वडील सिंगापूरमध्ये होते. त्यांनी रामची पत्नी गौतमीला फोन करून रामशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. फोनवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना आता पुढे कोणताही त्रासदायक उपचार घ्यायचा नाही आणि शांततेत जगाचा निरोप घ्यायचा आहे.(Ram Kapoor)
"तू मला मदत करू शकतोस का?"
रामने आपल्या आणि वडिलांच्या नात्याबद्दल सांगताना म्हटले, "माझे वडील खूप श्रीमंत उद्योगपती होते. पण मी त्यांचा व्यवसाय सांभाळण्याऐवजी अभिनयाचे क्षेत्र निवडले, त्यामुळे आमच्यात नेहमी मतभेद असायचे. पण जेव्हा कर्करोग पुन्हा उद्भवला, तेव्हा त्यांनी मला थेट विचारले— 'मला एकट्याने जायची भीती वाटतेय. तू मला मृत्यू स्वीकारण्यास मदत करू शकतोस का?' सुरूवातीला मला धक्का बसला, पण जर मी मदत केली नाही तर ते हे एकटेच करतील, याची त्यांनी मला जाणीव करून दिली."(Ram Kapoor)
ICU मधील शेवटचे क्षण आणि कुटुंबातील दुरावा
वडिलांच्या इच्छेनुसार रामने ही गोष्ट कुटुंबात कोणालाही न सांगण्याचे वचन दिले होते. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) कोणताही उपचार सुरू नसतानाही राम त्यांच्याजवळ थांबून राहिला आणि त्यांचा हात धरून त्यांना जगाचा निरोप घेण्यास मदत केली. वडिलांची ही अंतिम इच्छा पूर्ण केल्यामुळे रामच्या कुटुंबात मोठा दुरावा निर्माण झाला. (Ram Kapoor)
राम म्हणाला
"माझी आई लाआणि बहीण गेल्या ५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून माझ्याशी बोलत नाहीत. पण मला वाटतं, एका मुलाने आपल्या पालकांसाठी केलेली ही सर्वात मोठी गोष्ट होती. या घटनेने माझा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला."
राम कपूरचा हा भावनिक प्रसंग ऐकून शोमधील हर्षद चोपडासह सर्वच स्पर्धक आणि उपस्थित प्रेक्षक अत्यंत भावूक झाले. (Ram Kapoor)