मुंबई, (Murlidhar Mohol Public Grievance Campaign): खासदार जनसंपर्क सेवा अभियान सलग १८व्या वेळी यशस्वीपणे पार पडले असून या १८ व्या अभियानासह सहाही विधानसभा मतदारसंघातील अभियानाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील चंदननगर भाजी बाजार येथे आयोजित अभियानाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला."अशी माहिती केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. (Murlidhar Mohol Public Grievance Campaign)
"या अभियानामुळे नागरिकांना त्यांच्या नागरी व वैयक्तिक समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते. अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा केला जातो, तर उर्वरित प्रकरणांवर समाधानकारक तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जातो. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि आवश्यक मार्गदर्शनही दिले जाते.आजपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन वेळा हे अभियान यशस्वीपणे पार पडले आहे. पुणेकरांचा वाढता विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हीच या अभियानाची खरी ताकद आहे." अशी प्रतिक्रिया मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Murlidhar Mohol Public Grievance Campaign)
यावेळी महापौर मंजुषाताई नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले, तसेच पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, सहकार मंत्रालय आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Murlidhar Mohol Public Grievance Campaign)