महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ छात्रसंघाच्या अध्यक्ष व सचिवपदी अभाविपचे उमेदवार बिनविरोध विजयी!

    28-Jul-2026   
Student Election
 
मुंबई : (Student Election) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस) छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दणदणीत सुरुवात केली असून छात्रसंघाच्या दोन महत्त्वाच्या पदांवर अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकतीच विद्यापीठामार्फत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांवर अन्य कुठल्याही उमेदवारांचे अर्ज शिल्लक न राहिल्याने अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.(Student Election)
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या एकूण ६ जागा आणि सिनेटच्या ३ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी अध्यक्षपदी रोहित माळी (के. डी. गावित फिजिओथेरपी महाविद्यालय, नंदुरबार) तसेच सचिवपदी ज्ञानेश्वर आंधळे (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथी महाविद्यालय, कोपरगाव) यांची बिनविरोध निवड झाली आहे. छात्रसंघाच्या उर्वरित ४ जागा आणि सिनेटच्या ३ जागांसाठी १० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. (Student Election)
 
या यशाबद्दल राज्यभरातील वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर आरोग्य विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांचे अभाविपने मनःपूर्वक आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांनी अभाविपवर दाखविलेला विश्वास हा संघटनेच्या सातत्यपूर्ण विद्यार्थीहिताच्या कार्याची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. (Student Election)
 
याबाबत बोलताना अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले, "आजकाल 'जेन-झी'च्या नावाखाली अनेक अनुचित गोष्टींना प्रसिद्धी दिली जात असताना महाराष्ट्रातील विद्यार्थी केवळ सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा क्षणिक चर्चांवर विश्वास ठेवत नाहीत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या, शैक्षणिक प्रश्नांवर भूमिका घेणाऱ्या आणि प्रत्येक कॅम्पसमध्ये सक्रिय असलेल्या अभाविपवर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. (Student Election)
 
छात्रसंघाच्या सहापैकी दोन महत्त्वाच्या जागांवर बिनविरोध विजय मिळणे हा त्याच विश्वासाचा स्पष्ट संदेश आहे. अभाविपने गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल, इंटर्नशिप, नोंदणी, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया तसेच विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभाविपबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या छात्रसंघाच्या उर्वरित चार जागा आणि सिनेटच्या तीन जागांच्या निवडणुकीतही अभाविपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे." (Student Election)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर