कल्याण: (Green KDMC) पर्यावरणाचा समतोल राखत शहराला हिरवेगार व प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी केडीएमसीने कंबर कसली आहे. एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण केल्यानंतर आता 'मिशन हरित केडीएमसी' अभियानांतर्गत डोंबिवलीच्या गणेश मंदिर परिसरही वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे आता हा परिसर ही बहरणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "मिशन हरित केडीएमसी" अभियानांतर्गत डोंबिवली (पूर्व) येथील गणेश मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला.(Green KDMC)
या कार्यक्रमाचे उद्घाटन केडीएमसीचे उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप गटनेता शशिकांत कांबळे, स्थानिक नगरसेवक शारदा चौधरी, मंदार हळबे, विशू पेडणेकर, रंजना पेणकर, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, फ प्रभाग सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध देशी प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.(Green KDMC)
उपमहापौर राहुल दामले म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. शहर अधिक हिरवेगार व प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.(Green KDMC)
अभिनव गोयल यांनी सांगितले की, प्रत्येक नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि विविध संघटना एकत्रितपणे वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाल्यास महापालिकेचे यंदाचे वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण होईल. शहरातील तसेच शहराबाहेरील योग्य जागा निश्चित करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावे व प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले.(Green KDMC)
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आणि ३५ सामाजिक संस्थानी सहभागी होऊन जबाबदारी स्वीकारली.(Green KDMC)