मुंबई : (Kargil Vijay Diwas) कारगिल युद्धातील भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेले शौर्य हे जगाच्या युद्धइतिहासातील अतुलनीय उदाहरण असून, भारताचा इतिहास जिवंत असेपर्यंत कारगिलचे वीर अजरामर राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकभवन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वीर सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, कुटुंबीय उपस्थित होते.(Kargil Vijay Diwas)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कारगिल युद्धात शत्रू उंच पर्वतरांगांवर तळ ठोकून बसला असतानाही भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने अद्वितीय समन्वय आणि पराक्रमाचे दर्शन घडवून एक-एक चौकी पुन्हा ताब्यात घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गोळीबार, बॉम्बहल्ले आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याला तोड नाही. कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे यांसारख्या अधिकाऱ्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च दिले.(Kargil Vijay Diwas)
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीरांचे योगदान भारत कधीही विसरणार नाही. आपल्या वीरांचा सन्मान करणारा समाजच उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. सैन्यातील जवान तर मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी लढत असतात. त्यामुळे शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे."(Kargil Vijay Diwas)
कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी प्रेरणादायी संदेश - राज्यपाल जिष्णु देव वर्मा
कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या दिवसातून प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून एकसंघ, सक्षम आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे. कारगिलमधील प्रत्येक शहीदामागे एक वीरमाता, वीरनारी आणि राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करणारे कुटुंब उभे आहे. अशा कुटुंबांप्रती संपूर्ण राष्ट्र कृतज्ञ असून त्यांचा सन्मान आणि कल्याणासाठी समाजाने सातत्याने सहभागी व्हावे आणि नव्या पिढीने कारगिल युद्धाचा इतिहास जाणून घेत भारतीय सशस्त्र दलांच्या समर्पणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.(Kargil Vijay Diwas)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....