तमिळनाडू : (vijay thalapathy) तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यांनी राजकारणात प्रवेश करत राजकीय प्रवास सुरु केल्यानंतर, आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक धनुष राजकारणात पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी अचानक जोर धरला आहे. नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात धनुषने चाहत्यांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यानंतर त्याच्या संभाव्य राजकीय प्रवेशाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (vijay thalapathy)
एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांच्या अफाट गर्दीला संबोधित करताना धनुषने समाजकार्य आणि एकतेवर भाष्य केले. तो म्हणाला, "एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आले आहेत. अशा एकतेमध्ये खूप मोठी ताकद असते. या एकतेला आपण एका चांगल्या उद्देशाशी जोडले पाहिजे. फक्त ऑडिओ लाँच किंवा फॅन मीटपुरते मर्यादित राहू नका. आपल्या परिसरातील लोकांसाठी आणि गरजू कुटुंबांसाठी जे शक्य आहे ते सामाजिक काम करा. तुम्ही समाजासाठी केलेल्या चांगल्या कामांमुळे मला तुमचा आणखी अभिमान वाटेल. धनुषने आपल्या चाहत्यांना संघटित होऊन समाजकार्य करण्याचे केलेले हे आवाहन पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याच्या राजकीय प्रवेशाशी याचा थेट संबंध जोडला आहे. (vijay thalapathy)
"थलपती विजयनंतर आता धनुषसुद्धा राजकारणाच्या वाटेवर पाऊल ठेवत आहे का?" अशा कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक चाहत्यांनी, "तामिळनाडूला अशा सुशिक्षित आणि शिस्तप्रिय विचारांच्या नेतृत्वाची गरज आहे," असे म्हणत त्याच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. (vijay thalapathy)
याच कार्यक्रमात धनुषने त्याच्या 'रायन' चित्रपटावरून झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या वादावरही भाष्य केले. तो म्हणाला की, एकाच वर्षात दोन राष्ट्रीय सन्मान मिळणे हा तमिळ सिनेसृष्टीचा गौरव आहे. तसेच टीकाकारांना उत्तर देताना त्याने खिलाडूवृत्ती दाखवत सर्वांनी एकत्र येऊन या यशाचा आनंद साजरा करावा, असे आवाहन केले. धनुषने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा स्वतःच्या राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या केवळ त्याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेल्या प्रतिक्रिया आणि शक्यतांवर आधारित आहे. (vijay thalapathy)